Shocking video: तुमच्या घरात जर लहान मूल असेल, तर ही बातमी तुम्ही आवर्जून वाचली पाहिजे. अलीकडच्या काळात आई-वडील आपापल्या कामात व्यग्र असतात. परिणामत: कित्येकदा त्यांचे लहान मुलांकडे दुर्लक्ष होताना दिसते. त्यामुळे अनुचित प्रकार घडल्याचे प्रसंग अनेकदा समोर आले आहेत.घरात लहान मूल असेल, तर आपल्याला सतत सावध राहावं लागतं.ते कधी काय करतील याचा नेम नसतो. असचं एक धक्कादायक प्रकरण सध्या समोर आलं आहे, यामध्ये काही लहान मुलांनी युट्युब बघून बॉम्ब बनवला आणि पुढे असं काही झालं की त्यांचा यामध्ये जीवही गेला असता. या चिमुकल्यांचा आताचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

यूट्युबवर व्हिडीओ पाहून मुलं बनवत होती बॉम्ब

सोशल मीडियावर नेहमी अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात. तर काही व्हिडिओ बघून अंगावर काटा येतो. लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं. त्यांच्याकडे झालेलं थोडसं दुर्लक्ष अनेकदा महागात पडू शकतं. बच्चेकंपनी खेळताखेळता काय करतील, याचा नेम नसतो. त्यामुळे तुमच्या घरी लहान मुलं असल्यास ही बातमी नक्की वाचणं गरजेचे आहे.एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मात्र नशिब बलवत्तर म्हणून हे चिमुकले बचावले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

रुग्णालयातील व्हिडीओ समोर

बिहारमधील मुझफ्फरपूरमधील गयाघाट येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेबाबत एसएसपी राकेश कुमार यांनी सांगितले की, एका स्फोटक पदार्थाचा स्फोट होऊन त्यात पाच मुलं होरपळली आहेत. या मुलांवर गयाघाट पीएचसी येथे उपचार करण्यात येत आहे. तसेच या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या मुलांनी यूट्युबवर व्हिडीओ पाहून फटाक्याची दारू टॉर्चमध्ये भरून नवा फटाका तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला माचिसची काडी पेटवून लावली. त्यामुळे स्फोट होऊन ही मुलं होरपळली. स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. तसेच या स्फोटामध्ये ही पाच मुलं होरपळून जखमी झाली. यांचा रुग्णालयातील एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ही मुलं रुग्णालयात बसलेली दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> कोल्हापूर म्हणजे विषय हार्ड ओ… हालगीच्या तालावर चिमुकले थिरकले; कोल्हापुरातील VIDEO तुफान व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.