Shocking video: वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. ओव्हरटेकिंग किंवा लेन कटिंगमुळेही बरेच अपघात होतात. काही जणांना अतिआत्मविश्वास नडतो; तर काही जणांचा अंदाज चुकतो. असाच एक अपघात ओव्हरटेक करताना झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.
रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे.
पंजाबमधील बठिंडा येथील गणेश बस्तीमध्ये रस्ता बांधकामाचा एक मोठा अपघात घडला. एका रोड रोलरने स्कूटरवरून जाणाऱ्या वडील आणि मुलीला मागून चिरडले. रोलरचे चाक त्यांच्यावरून गेले. वडील विशाल गुप्ता यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची मुलगी मन्नत गंभीर जखमी झाली असून तिच्यावर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. कुटुंबीय आणि रहिवाशांचा आरोप आहे की, रोड रोलरचा चालक हेडफोन घालून होता आणि तो बेदरकारपणे रोलर मागे घेत होता. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला. अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो धक्कादायक आहे. रस्त्याच्या बांधकामादरम्यान सुरक्षेची कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे लोक प्रशासन आणि कंत्राटदारावर संतप्त आहेत.
सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले भयानक दृश्य
अपघाताच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये विशाल गुप्ता आपल्या मुलीसोबत स्कूटर चालवताना स्पष्टपणे दिसत आहेत. ते एका नव्याने बांधलेल्या रस्त्यावरून जात असताना त्यांची स्कूटर अचानक घसरली, ज्यामुळे ते खाली पडले. त्याचवेळी रस्त्यावर फिरत असलेल्या एका रोड रोलरने त्या दोघांना चिरडले. स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मुलीला बाहेर काढले, परंतु विशालला वाचवता आले नाही. त्याचा जागीच मृत्यू झाला.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा.
