Shocking Accident Video : सध्या महाराष्ट्रासह अनेक राज्यांत कडाक्याची थंडी सुरू आहे. त्यामुळे अनेक वाहनचालकांना धुक्यामुळे मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतोय. धुक्यामुळे चालकाला वाहन चालविताना समोरचे नीट दिसत नसल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडताना दिसतात. अनेकदा धुक्याच्या ठिकाणी घडणाऱ्या अपघाताच्या घटना इतक्या भयानक असतात की, पाहताना आपल्यालाही भीती वाटते. कारण- यावेळी दोन-तीन वाहनेच नाहीत तर एकामागून अनेक वाहने समोर स्पष्ट दिसत नसल्याने एकमेकांवर आदळतात; ज्यात काहींचा मृत्यूदेखील होतो. सध्या अशाच एका भयानक अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

महामार्गावर दाट धुक्यामुळे समोरचा रस्ता न दिसल्यामुळे झाला विचित्र अपघात

१० जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील हापूरमधून जाणाऱ्या दिल्ली-लखनऊ NH-9 महामार्गावर दाट धुक्यामुळे समोरचा रस्ता न दिसल्यामुळे हा विचित्र अपघात झाला आहे. कार, ट्रक, एसयू्व्ही अशी अनेक वाहने एकमेकांवर आदळली आणि त्यामुळे या वाहनांचे पुढचे बोनेट तुटले आहे. या अपघातात एक-दोन वाहनेच नाहीत, तर अनेक वाहने रांगेत एकमेकांना धडकली. या अपघाताच्या घटनेनंतर हापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले.

bike thief shocking video viral
तुम्ही बाईक बिनधास्त कुठेही पार्क करताय? चोर अवघ्या सेकंदात अशी करतायत बाईकची चोरी; धक्कादायक VIDEO पाहाच
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
maha kumbha mela 2025 khoya paya kendra funny video
VIDEO : “ऐ राजू, हम ढूंढ रहे है रे बाबू…”, महाकुंभ मेळ्यात हरवलेल्या लोकांसाठी होतायत अशा घोषणा की, ऐकून पोट धरून हसाल
AI-generated video falsely claims Taylor Swift said wildfires are God's revenge for Gaza
“अमेरिकेतील आग ही गाझावरील हल्ल्यासाठी देवाने दिलेली शिक्षा”; टेलर स्विफ्टचे धक्कादायक विधान? पण खरं काय, वाचा
mahakumbh mela 2025 fact check video
महाकुंभ मेळ्यातील रुग्णालयात भीषण आग, ८ जण जखमी? लोकांचे जीव वाचवण्यासाठी पोलिसांची धावाधाव; वाचा, Video मागचं सत्य काय?
shocking video Viral
रीलसाठी ओलांडली मर्यादा! मांजरीला बांधून श्वानापुढे टाकलं अन्… थरकाप उडवणारा VIDEO पाहाच
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
father emotional video heart touching viral video
“देवा, अशी वेळ शत्रूवरही येऊ नये” वृद्धाश्रमातील बापाची लेकाला आर्त हाक; हृदयस्पर्शी VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

धुक्यामुळे अनेक वाहने पडली अडकून

या व्हिडीओमध्ये एकापाठोपाठ जवळपास सहा गाड्या एकमेकांवर आदळल्याचे दिसतेय. त्यात एका मिनी गाडीसह अनेक चार चाकी वाहनांच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. अनेक जण या अपघातानंतर वाहन सोडून गाड्यांमधून बाहेर पडले. यावेळी पोलिसही घटनास्थळी उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे नागरिक आणि बचाव पथकानेही घटनास्थळी धाव घेतली. व्हिडीओत वाहनांची अक्षरश; दुर्दशा झाल्याचे पाहायला मिळतेय. तसेच दाट धुक्यात वेगात वाहन चालवणे जीवाला किती धोका ठरू शकते हे दिसून येते.

दिल्ली आणि उत्तर प्रदेशात दाट धुक्यामुळे वाहन चालविणे आणखी कठीण झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी दाट धुक्यात वाहन काळजीपूर्वक चालवावे. व्हायरल व्हिडीओतही अनेकांनी एकत्र सावधगिरी बाळगली असती, तर एवढी मोठी दुर्घटना घडली नसती.

“देवा, अशी वेळ शत्रूवरही येऊ नये” वृद्धाश्रमातील बापाची लेकाला आर्त हाक; हृदयस्पर्शी VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

दरम्यान, अनेक जण या घटनेनंतर दाट धुक्यात सावधपणे वाहन चालविण्याचा सल्ला देत आहेत; तर अनेक जण असे अपघात टाळण्यासाठी काय उपाय करता येतील अशी विचारणा करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिले की, दाट धुके असतानाही लोक प्रवास करणे टाळत नाहीत. दुसऱ्या युजरने म्हटले की, हे भयानक आणि दुःखदायक आहे.

Story img Loader