एखाद्या छंदापायी माणूस कसा कधी अडकून जाईल हे सांगता येणार नाही. आपल्या आजूबाजूला लोकांना अनेक छंद असतात. अगदी वापरात नसलेली नाणी गोळा करणे ते महागडी चित्र, वस्तू आपल्या कलेक्शन मध्ये जोडण्यापर्यंत नानाविध छंद लोक जोपासतात. पुरातन गोष्टींच्या बाबत तर हे क्रेझ विशेष असते. अनेकदा मोठमोठ्या संग्रहालयात पुरातन वस्तूंच्या विक्रीचे लिलाव आयोजित केले जातात, ज्यात अगदी साधारण वाटणाऱ्या वस्तू कोट्यवधि रुपयात विकल्या जातात. असाच एक पुरातन वस्तूंचा लिलाव अलीकडे पार पडला,आणि त्यात एका कुटुंबाने मोठी बोली लावून सुटकेस जिंकल्या. वरून साधारण वाटत असलेल्या त्या सुटकेस जेव्हा कुटुंबाने उघडून पाहिल्या तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

एक ‘जादू की झप्पी’ ठरली डोक्याला ताप; तीन बरगड्या मोडल्या, दीड लाखाचा दंड भरला, वाचा सविस्तर

न्यूझीलँड मध्ये घडलेल्या या प्रसंगात, साऊथ ऑकलँड मध्ये एका लिलावात कुटुंबाने काही सुटकेस जिंकल्या होत्या. घरी गेल्यावर जेव्हा त्यांनी या सुटकेस उघडून पहिल्या तेव्हा त्यात चक्क मृतदेह आढळून आले. थोडं भानावर आल्यावर या कुटुंबाने पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित कुटुंबाचा या सुटकेस मधील मृतदेहांशी काहीही संबंध नाही तसेच या व्यक्तींच्या मृत्यू मध्ये सुद्धा त्यांचा काही हात नाही.

न्यूझीलँड पोलिसांच्या प्रवक्त्या, ऍना थॉम्प्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस मृतांची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या मृतदेहांचे पोस्टमोर्टम अहवाल प्राप्त झाल्यावर त्यांच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल. सध्या पूर्ण तपास होईपर्यंत ज्या कुटुंबांकडे या सुटकेस आढळल्या त्यांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कुटुंबात एक वयोवृद्ध पुरुष, एक महिला व ३० वर्षीय तरुणाचा समावेश आहे.

16 गाढवांनी जोधपूर पोलिसांचा जीव केला हैराण.. कारण ऐकाल तर चकित व्हाल

दरम्यान, संबंधित लिलाव हा स्टोरेज युनिट तर्फे आयोजित करण्यात आल्या होत्या. अशा प्रकारचे लिलाव देशात कॉमन आहेत, यामध्ये ग्राहकांना वस्तू विकत घेण्याआधी तपासण्याची परवानगी नसते. जेव्हा एखादी वस्तू डिस्प्ले केली जाते तेव्हा तिच्यावर बोली लावून थेट विक्री खरेदी पार पडते.