Shocking Reel Video : सोशल मीडियावर व्हिडीओ रील्स बनवून अनेकांचे नशीब चमकले आहे. आता बिग बॉस मराठी विजेता सूरज चव्हाणचंच उदाहरण घ्या ना, एकेकाळी टिकटॉकवर अनोख्या रील्स बनवणारा सूरज चव्हाण आज एक सेलिब्रिटी स्टार झाला आहे. अशाचप्रकारे लाखो लोक रोज रील्स व्हिडीओच्या माध्यमातून लाखो-करोडो रुपये कमावतात. पण, काही जण हे रील्स व्हिडीओ बनवण्याच्या नादात आपला जीव धोक्यात घालतात. अनेकदा अशा घटना घडल्या आहेत, ज्यात व्हिडीओ बनवताना अनेकांनी आपला जीवसुद्धा गमावला आहे. कधी रेल्वे रूळांवर, कधी बाईकवर; तर कधी घरात अनोख्या स्टंटबाजी करतानाचे व्हिडीओ लोक शूट करताना दिसतात. पण, अनेकदा हे व्हिडीओ बनवताना ते आपला जीवही धोक्यात घालतात. सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात तो जीव धोक्यात घालून रील बनवताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे तो रील शूट करण्यासाठी जे काही करतोय ते पाहून तुमच्याही काळजाचं पाणी पाणी होईल.

तरुण घराच्या टेरेसवर करतोय अतिशय धोकादायक स्टंट

सोशल मीडियावर व्हायरल होण्याची वाढती क्रेझ पाहता लोक काहीही करायला तयार असतात. अनेकदा ते स्वत:चा जीव धोक्यात घालतानाही मागे पुढे पाहत नाहीत. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही तरुण तेच करतोय. हा तरुण घराच्या टेरेसवर अतिशय धोकादायक स्टंट करत असल्याचे दिसत आहे.

uncle dance so gracefully
काकांनी केला अप्रतिम डान्स, चेहऱ्यावरील हावभाव अन् डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO होतोय व्हायरल
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
a young guy holding paati in hand wrote amazing message who burst so many firecrackers in Diwali
Video : “दिवाळीत फटाके तेवढेच फोडा…”; तरुणाने सुनावले खडे बोल, पाटी होतेय व्हायरल
The young man suddenly got dizzy in the metro only mother came to help
मेट्रोमध्ये तरुण अचानक चक्कर येऊन पडला, शेवटी आईच धावून आली, पाहा Viral Video
Emotional Wedding Video
वेड्या बहिणीची वेडी ही माया! बहि‍णीला हळद लावताना ढसा ढसा रडला भाऊ, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Indian jugad To Stop Footwear Theft In The Temple Use This Unique Trick Desi Jugaad Video
VIDEO: मंदिरात किंवा गर्दीच्या ठिकाणी तुमचीही चप्पल चोरीला जाते का? मग हा जुगाड कराच, कधीच चप्पल चोरी होणार नाही
In Kendur village cousin was nearly crushed under car over land dispute
Video : जमिनीच्या वादातून चुलत भावाला मोटारीखाली चिरडण्याचा प्रयत्न, शिरुरमधील केंदूर गावातील घटना
suraj chavan new reel comments
सूरज चव्हाणचे ट्रेडिंग गाण्यावर रील पाहून युजर म्हणाला, “भाऊ, तू असे व्हिडीओ नको बनवत जाऊस…”

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, टेरेसच्या बॉर्डरवर आपले दोन्ही पाय ठेवत तरुण चाकूच्या साहाय्याने खिळ्यावर आपला तोल सांभाळत आहे. यावेळी त्याच्या हातात एक चाकू आहे आणि तो त्या चाकूची धारदार बाजू खिळ्यावर ठेवून त्यावर शरीराचा बॅलेन्स सांभाळण्याचा प्रयत्न करतो आहे. इतकेच नाही तर हे करत असताना त्याने पाठीवर जवळपास २० किलोपेक्षा जास्त वजनची गोणीही ठेवली आहे, जी त्याला पाठीवर ठेवण्यासाठी त्याचा मित्र मदत करत आहे. अशाप्रकारे तो हातात चाकू अन् पाठीवर गोणी ठेवून एका खिळ्यावर तोल सांभाळण्याचा प्रयत्न करतो आहे. पण, पहिला प्रयत्न फसतो; यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याला काहीसे यश येते, पण हे करत असताना जर चुकून त्याचा तोल गेला असता तर हे सर्व त्याच्यासाठी फारच जीवघेणे ठरू शकले असते.

Indian Railway : रोज ट्रेनने प्रवास करणाऱ्यांनो ‘ती’ स्वच्छ कशी केली जातेय माहितेय का? अवघ्या आठ मिनिटांत होते चकाचक; पाहा Video

हा अत्यंत धोकादायक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर mr.against_gravity01 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘हा प्रयत्न तुम्ही करू नका.’ दरम्यान, अनेकांना हा व्हिडीओ पाहून धक्काच बसला आहे. कमेंट सेक्शनमध्येही अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने लिहिले, ‘हा पुन्हा प्रयत्न करू नका, कारण प्रसिद्धीपेक्षा जीवन महत्त्वाचा आहे.’ दुसऱ्या युजरने लिहिले, ‘असे करू नका भावा, कारण तुला असे आयुष्य पुन्हा मिळणार नाही.’ तिसऱ्या युजरने लिहिले, ‘भावा, केवळ व्हिडीओला व्ह्यूज मिळवण्यासाठी असे करू नको.’