Kanpur Shocking Student Stripped Naked: कानपूरमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याला पैसे न दिल्याच्या कारणावरून सिनिअर्सच्या टोळक्याने छळ करून मारहाण केल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. या घटनेचे काही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सोमवारी सहा जणांना अटक केली होती.तनय चौरसिया, अभिषेक कुमार वर्मा, योगेश विश्वकर्मा, संजीव कुमार यादव, हरगोविंद तिवारी आणि शिवा त्रिपाठी अशी आरोपींची नावे आहेत.

अत्याचाराचं कारण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुण स्पर्धा परीक्षेच्या कोचिंग क्लासेससाठी इटावाहून कानपूरला आला होता. तो कोचिंग सेंटरमधील काही सिनिअर विद्यार्थ्यांच्या संपर्कात आला, ज्यांनी त्याला ऑनलाइन सट्टेबाजी खेळण्यासाठी २० हजार रुपये दिले होते. तो सगळे पैसे हरल्यानंतर सिनिअर्सनी त्याला वीस हजार ऐवजी दोन लाख रुपयांची भरपाई करण्यास सांगितले व यासाठी त्याच्यावर खूप दबाव आणला. इतकं करून पीडित विद्यार्थ्याला पैसे परत करता न आल्याने त्यांनी त्याला खोलीत कोंडून मारहाण केली.

Viral video shows dog travelling in Mumbai local netizens say smarter than many Mumbaikars snk 94
“मुंबईकरांपेक्षा हुशार आहे हा कुत्रा”, लोकलमध्ये प्रवास करताना चक्क कुत्र्याने पाळली शिस्त, Video Viral नेटकरी झाले अवाक्
Mahavitrans smart move The word prepaid has been removed from the smart meter
महावितरणची स्मार्ट खेळी! स्मार्ट मीटरमधून ‘प्रीपेड’ शब्द वगळला; प्रसिद्धीपत्रकात…
hardik pandya natasha stankovik divorce
Hardik Pandya Divorce: हार्दिकशी घटस्फोटाच्या प्रश्नावर नताशानं दोनच शब्दांत दिलं उत्तर; प्रश्न विचारताच म्हणाली…
madhuri dixit and kartik aryan dances on dholna song
Video : २७ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर माधुरी दीक्षित अन् कार्तिक आर्यनचा जबरदस्त डान्स! नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
What Shrikant Shinde Said?
Dombivli MIDC Blast: बॉयलर स्फोटानंतर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया, “अतिधोकादायक केमिकल बनवणाऱ्या कंपन्या..”
raghunandan kamath profile
व्यक्तिवेध : रघुनंदन कामत
Is your morning bread an enemy of gut health? Here’s why you should junk all ultra-processed foods
रोज सकाळी ब्रेड खाणे आतड्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक?अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ खाणे का टाळावे?
Video Neeta Ambani Requesting Chats With Rohit Sharma
नीता अंबानी रोहित शर्माला काय म्हणाल्या? मुंबईच्या दहाव्या पराभवानंतर ‘ते’ संभाषण कॅमेऱ्यात कैद, Video पाहा

आरोपींनी या कृत्याचे व्हिडीओ शूट सुद्धा केले, व्हिडीओमध्ये ते विद्यार्थ्याच्या गुप्तांगावर लाथा मारताना आणि मुक्का मारताना दिसत होते. एका व्हिडिओमध्ये एक आरोपी विद्यार्थ्याचे केस जाळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्याला त्याच्या प्रायव्हेट पार्टला वीट बांधून नग्न अवस्थेत दाखवण्यात आले आहे.

पोलिसांच्या कारवाईवर पालकांचा संताप

अनेक दिवस हा प्रकार सुरू होता, त्यानंतर विद्यार्थ्याने त्याच्या पालकांना याची माहिती दिली, ज्यांनी नंतर इटावा पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या दबावाखाली येऊन सर्वांना सोडून दिल्याचे विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. मात्र, ४ मे रोजी या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, कानपूर पोलिसांनी कारवाई करून सहाही आरोपींना अटक केली.

हे ही वाचा<< VIDEO: आधी देवाला नमस्कार केला, आशीर्वाद घेतला अन्… बाजूच्या घरावर फेकले बॉम्ब; पण एक चूक पडली महागात

पोलिस उपायुक्त आर.एस. गौतम यांनी सांगितले की, आरोपींवर आयपीसी कलम १४७, ३४, ३४३, ३२३, ५००, ५०६ आणि ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर पोक्सो कायद्याच्या तरतुदी आणि कलम ६७(बी) अंतर्गतही आरोप ठेवण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची एक टोळी तयार झाली आहे आणि ते एका फ्लॅटमध्ये राहतात, जिथे ते निष्पाप विद्यार्थ्यांना अडकवतात आणि त्यांना धमकावून ब्लॅकमेल करतात.