Shocking stunt video viral : सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे, जेथे आपल्या नवनवीन व्हिडीओ पाहायला मिळतात. जे आपलं मनोरंजन करतात. येथे आपल्याला कॉमेडी, इंफोर्मेटीव्ह आणि बरेच क्राफ्ट व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. आपण सिनेमांमध्ये अनेक वेळा उंच इमारतीवरून हिरोला स्टंट करताना पाहिलं असेल. मात्र खऱ्या आयुष्यातही काही तरुण असे अनेक स्टंट करतात, जे पाहून आपल्या अंगावर काटा उभा करतात. तर बरेच लोक असे देखील असतात, जे स्टंट करायला जातात खरं, परंतु त्यांच्यासोबत असं काहीसं घडतं, ज्याचा आपण विचार देखील करु शकत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही घाम फुटला आहे.
हिसारमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका तरुणाला एका लोकप्रिय ठिकाणी धोकादायक स्टंट करताना दाखवले आहे. या व्हिडीओमध्ये तु्म्ही पाहू शकता, काही तरुण उंच इमारतीवरुन स्टंटबाजी करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केलेल्या या क्लिपमध्ये तो २८२ फूट उंच जिंदाल टॉवरवर कोणत्याही सुरक्षा उपकरणाशिवाय धोकादायक आणि जिवघेणा स्टंट करत आहे. हिसार महानगरपालिकेजवळील जिंदाल टॉवरवर हा स्टंट घडला.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, राजस्थानचा राहणारा हा तरुण कसा तरी टॉवरची सुरक्षा सीमा ओलांडून इमारतीच्या कडेला गेला, असे टाईम्स ऑफ इंडिया सिटीने वृत्त दिले आहे. त्याच्या बॅगेत दोन बिअरच्या बाटल्या आणि एक कॅन होता. काठावर आल्यानंतर, त्याने बाटल्या ठेवल्या आणि धोकादायक स्टंट करू लागला. एका क्षणी, तो डोक्यावर उभा राहिला, फक्त हातांनी टॉवरवरून लटकला आणि उलटे लटकण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होते. तरुणाची थोडीशी चूक त्याच्या जिवावर बेतू शकते. त्याच्या आजूबाजूला असणारे तरुण त्याला प्रोत्साहन देताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
theharyanadaily नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. कोणत्याही सुरक्षेशिवाय वतरुण अशा प्रकारे उडी मारताना पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आतापर्यंत या व्हिडीओला हजारोंहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओने लगेचच ऑनलाइन लक्ष वेधून घेतले. अनेक प्रेक्षकांनी सांगितले की त्यांना व्हिडीओ पाहतानाच भीती वाटली. एकाने लिहिले, “हे मला इतके घाबरवते का? मला फक्त त्याला पाहताना एवढी भीती वाटतेय.” दुसऱ्याने म्हटले, “काही लोक मजा किंवा प्रसिद्धीसाठी स्वतःचे जीवन धोक्यात घालतात. हा माणूस स्वतःच्या जीवाशी खेळत आहे.”

