Viral video: एकेकाळी बुलेटचा आवाज आला की, दूधवाला आला अशीच या गाडीची ओळख होती. पण, आता या गाडीची तरुणांमध्ये क्रेझ आहे. स्वस्तातील फोरव्हीलरपेक्षा महाग असलेल्या या गाडीमुळे रुबाब वाढतो, असे तरुणाईचे ‘इंप्रेशन’ आहे. त्यामुळेच आता कॉलेजच्या पार्किंगमध्ये बुलेट दिसू लागली आहे. फक्त तरुणाईमध्येच नाही तर सगळ्याच वयोगटातील लोकांमध्ये बुलेटचं वेगळंच क्रेझ आहे. अशाच एका बुलेटप्रेमी काकांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये त्यांनी मौत का कुवामध्ये बुलेट चालवण्याचं धाडस केलं आहे. हा व्हिडीओ पाहताना तुम्हीही श्वास रोखून धराल.

सोशल मीडियावर फेमस किंवा व्हायरल होण्यासाठी लोक काय करतील याचा काही नेम नाही. अशात अनेक महानग प्रसिध्दीसाठी स्वतःचा जीव देखील धोक्यात टाकतात. यातील काही जण आपल्या स्टंटमध्ये सफल होतात. तर काहींना जन्माची अद्दल घडते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतं आहे.प्रत्येक जत्रेत ‘मौत का कुआँ’ (मृत्यूचा विहीर) हा खेळ पाहायला मिळतो. हा खेळ जितका मनोरंजक आहे, तितकाच धोकादायकही आहे. या खेळात एक छोटीशी चूकही जीव धोक्यात आणू शकते. ज्यांनी हा खेळ पाहिला नाही, त्यांना सांगायला हवं की, यात खोल विहिरीसारख्या जागेत वाहने चालवली जातात, ही वाहने भिंतींवर वेगाने फिरत राहतात. हा खेळ पाहणे रोमांचक असते, पण तो धोक्यांनी भरलेला असतो.

Shocking video Young Man Risks His Life By Climbing 30-Ft Hoarding On Highway For Instagram Reel In UP's Saharanpur
“हे सगळं करताना एकदाही आई-वडील आठवत नाहीत?” तरुणानं रीलसाठी अक्षरश: कळस गाठला; VIDEO पाहून थरकाप उडेल
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
Young man abuses young woman while police arrested the accused viral video on social media
VIDEO: त्याने भररस्त्यात तरुणीला अडवलं, ती जीव मुठीत घेऊन पळाली; पुढे काय घडलं ते एकदा पाहाच…
Young woman threatened suicide did scene in road accused man for making her private video viral
“का केलेस माझे खासगी व्हिडीओ व्हायरल?” तरुणीनं भर रस्त्यात घातला राडा; शेवटी आत्महत्येची धमकी दिली अन्.., पाहा धक्कादायक VIDEO
Shocking video viral
थंडीत काकांनी केले जीवघेणे कृत्य, सिलिंडरला लावली आग अन्… VIDEO मध्ये पुढे काय घडलं एकदा पाहाच
Man opens door finds a tiger waiting outside viral shocking video goes viral
दरवाजा उघडला आणि समोर मृत्यू उभा! एका निर्णयानं तो थोडक्यात बचावला; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप
Shocking video a girl dies after goods train hit her while crossing tracks in up video goes viral on social media
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; रुळ ओलांडताना नक्की काय घडलं?; तरुणीनं फक्त २ सेकंदांसाठी गमावला जीव
Wamik Karad Audio Clip
“इथं बीड जिल्ह्याचा बाप बसलाय”, वाल्मिक कराडची आणखी एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; पोलीस अधिकाऱ्याला म्हणाला…

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे काका बुलेट बाईकने ‘मौत का कुआँ’मध्ये फिरताना दिसत आहेत. हा अद्भुत खेळ पाहून लोक थक्क झाले आहेत, कारण त्यात पुढच्याच क्षणी काय होईल हे कुणालाच माहिती नसतं. दरम्यान काही वेळ बाईक चालवल्यानंतर, काका आपली बुलेट अतिशय आरामात बाहेर काढत सुखरुप खाली येतात.

पाहा व्हिडीओ

स्टंटबाजी करणाऱ्या लोकांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यात लोक एकापेक्षा एक धोकादायक स्टंट करताना दिसतात. या स्टंटबाजांवर पोलिसांकडून अनेकदा कारवाई केली जाते; पण लोक अशी कृत्ये करण्यापासून परावृत्त होत नाहीत. प्रसिद्ध होण्याचे भूत त्यांच्या मानेवर असे काही बसलेले असते की, त्याशिवाय त्यांना दुसरे काहीच काम नाही, अशा रीतीने ते वागतात. हे काका यातून सुखरुप बाहेर पडले मात्र प्रत्येक वेळी असं होईलच असं नाही.

Story img Loader