Shocking video: सोशल मीडियावर दिवसभरात भरपूर व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडीओ पहायला मिळातात. मजेशीर, भावनिक, विचित्र, धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. मात्र काही काळापासून असे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये अचानक लोकांचे मृत्यू होत आहेत. अन्न खाताना, व्यायामशाळेत व्यायाम करताना किंवा नाचत असतानाही लोकांचा अचानक मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या. यामध्ये आता आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. हल्ली हार्ट अटॅक किंवा स्टॉक्सचे प्रमाण लोकांमध्ये वाढले आहेत. काही काळापूर्वी अटॅक फक्त वृद्ध लोकांना येत होते. परंतू आता तरुण आणि अगदी लहान मुलांना देखील हे येत आहे. यासंबंध काही व्हिडीओ ही सोशल मीडियावर समोर आले आहे. जे तुम्ही पाहिले ही असतील. हे व्हिडीओ हृदयाचे ठोके चुकवणारे असतात.असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती चक्क चहा पिताना टपरीवरच कोसळला आहे.
उत्तर प्रदेशातील झांसीमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. ड्युटी दरम्यान चहा घेण्यासाठी गेलेल्या 29 वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. काही सेकंदात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसतो आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय कुशवाहा हा झांसी शहरातील नवाबस्ती भागात राहात होता. तो रेल्वेच्या डीआरएम कार्यालयात चालक म्हणून कार्यरत होता. त्याच्या वडिलांच्या निधनानंतर त्याला सुमारे दोन वर्षांपूर्वी अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली होती. सोमवारी संध्याकाळी ४ ते रात्री १२ या वेळेत त्याची ड्युटी होती.संध्याकाळी सुमारे ७ वाजून ४९ मिनिटांनी अजय त्याच्या ऑफिसपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या चित्रा चौकातील एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेला. सीसीटीव्ही फुटेजनुसार, त्याने शांतपणे चहा घेतला आणि पैसे दिल्यानंतर बाहेर पडला. त्यानंतर तो प्लास्टिकची पिशवी मागत असताना अचानक तोल जाऊन खाली कोसळला.घटनेनंतर सुमारे १० ते २० मिनिटांनी त्याचे सहकारी आणि कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आणि त्याला तातडीने मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. प्राथमिक अंदाजानुसार, अजयचा मृत्यू हार्ट अटॅक किंवा कार्डियक अरेस्टमुळे झाला असावा, असा संशय व्यक्त केला जातोय.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ indoreupdate2026 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर “मृत्यू वेळ बघून येत नाही” अशा आणि अनेक कमेंट येत आहेत.
