सोशल मीडियावर आपण अपघाताचे अनेक व्हिडीओ पाहतो. अनेकदा असे व्हिडीओ खूप व्हायरल होतात. काही अपघात तर इतके भयानक असतात, जे पाहून आपल्या अंगावर शहारे येतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. या व्हिडीओमध्ये एक कार बिना ड्रायव्हरची आपोआप सुरु होऊन नदीमध्ये पडताना दिसते.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर इंटरनेट यूजर्स हैराण झाले आहेत. ज्यांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही आहे. पार्किंगमध्ये गाडी उभी असताना ती स्वतःहून नदीत कशी पडली, हा प्रश्न लोकांना पडला आहे. पार्किंगमध्ये उर्वरित गाड्यांसोबत लाल रंगाची कार उभी असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. मग अचानक असे काही तरी झाले की ही गाडी आपोआप मागे सरकू लागली. मागे मागे चालत ही गाडी थेट नदीत पडल्याचे पाहायला मिळते.

Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास
mundu-clad gang boys dance on lungi shirt
Video : लुंगी शर्टवर तरुणांनी केला झकास डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, व्हिडीओ होतोय व्हायरल

सबस्क्रायबर्स वाढवण्यासाठी Netflix ची अनोखी योजना; आता खाते इतरांशी शेअर केल्यास होणार ‘ही’ कारवाई

किली पॉलच्या कुऱ्हाडीसोबच्या अ‍ॅक्शन सीनवर नेटकरी झाले फिदा! बघा Viral Video

कार दोन रस्ते ओलांडून नदीत जाऊन पडल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. यादरम्यान रस्त्यावरून इतर वाहने ये-जा करताना दिसतात. सुदैवाने कार नदीत पडली तेव्हा त्यात कोणीही बसले नव्हते आणि चांगली गोष्ट म्हणजे गाडी जवळून जाणाऱ्या कोणत्याही गाडीची या कारसोबत धडक झाली नाही. हा व्हिडीओ लॅटव्हियाची राजधानी रिगा येथील आहे. रिगा पोलिसांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

वास्तविक, ही कार एका उतारावर उभी होती आणि कारला हँडब्रेक नसल्याने, तिला हलकासा धक्का लागून ती मागे सरकत सरकत नदीमध्ये जाऊन पडली. हा व्हिडीओ इंटरनेटवर खूप वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. आपत्कालीन सेवेच्या कर्मचार्‍यांना खूप प्रयत्नांनंतर कार पाण्याखालून काढली. ही घटना १४ एप्रिल रोजी लॅटव्हियाची राजधानी रीगा येथे घडली.