Shocking Viral Video : “हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे” हे लोकप्रिय गीत तुम्ही ऐकले असेल. माणसाशी माणसाशी माणुसकीने वागले पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. माणुसकी जपणे हाच सर्वात मोठा धर्म आहे, हे आपण लहानपणापासून शिकत आलो आहोत पण समाजात असे काही लोक आहेत, जी इतकी क्रुर वागतात की आपण विचारही करू शकत नाही. सध्या अशीच एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल एक व्यक्ती दुचाकीवर येते आणि बाळाला रस्त्याच्या मधोमध सोडून जाते. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा संतापजनक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक माणूस दुचाकी अर्ध्या रस्त्यात थांबवतो. त्याच्या पाठीमागे चिमुकला मुलगा बसलेला दिसतो. तितक्यात तो त्याच्या पुढे ठेवलेल्या बाळाला बाहेर काढतो आणि गाडीच्या शेजारी एका बाजूला रस्त्यावर ठेवतो आणि तिथून निघून जातो. जसा तो जातो. बाळ रांगायला लागते. त्या रांगत्या बाळाला पाहून लोक जमा होतात आणि त्या बाळाला उचलतात. काही लोकांनी ते बाळ रस्त्यावर ठेवताना पाहिलेले असते. तिथे जमलेल्या सर्वांना या क्रुर कृत्यामुळे धक्का बसतो. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
maharastrin_top_models या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मनाला खुप वाईट वाटलं” तर एका युजरने लिहिलेय, ” अंगावर शहारे आले बघूनच” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे भारतातलं नक्कीच नाही पण हे खूप वाईट आहे. अरे ज्यांना नाही त्यांना तरी द्या ना, लांब कुठं तरी त्याचं कल्याण होईल.” एक युजर लिहितो, “डोळ्यातून पाणी आलं असले आई बाप कोणाला नको देऊ देवा” तर एक युजर लिहितो, “एक,एक जण मूल होत नाहीत, म्हणून काय काय करत आहेत आणि ही लोक आहेत? देव पण कुणाच्या पदरात देतो” तर एक युजर लिहितो, “अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं.. ही वृत्ती फक्त माणसातच पहायला मिळेल..एक लक्षात ठेवावं जैसे कर्म तैसे फळं. ज्यांना मुलं बाळं होत नाहीये त्यांना जाऊन विचारा, त्यांचं दुःख काय आहे ?
आणि तुम्हाला दिलं आहे तर तुम्हाला घेता येईना..” अनेक युजर्सनी व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे