VIDEO : अनेक लोकं पाळी प्राणी पाळतात. आपल्या भारतात कुत्रा, मांजर, गाय, बकरी असे अनेक प्राणी पाळले जातात. वाघ, सिंह, बिबटे, चित्ते या सर्व जंगली प्राण्यांना पाळीव प्राणी म्हणून घरात ठेवता येत नाही. पण काही असे देश आहेत जे जंगली प्राण्यांना पाळतात. त्यांना घरातील एका सदस्यांप्रमाणे प्रेम करतात. सध्या हा ट्रेंड खूप वाढत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक पर्यटक एका लक्झरी कन्व्हर्टिबल चालवताना दिसत आहे. त्याच्या गाडीच्या मागच्या सीटवर सिंह बसलेला दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक व्यक्ती गाडी चालवताना दिसतोय. आणि त्याच्या गाडीच्या मागच्या सीटवर सिंह बसलेला दिसत आहे. सिंह खिडकीतून बाहेर बघताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणालाही धक्का बसेल किंवा कोणाच्याही अंगावर काटा येऊ शकतो. हा सिंहाला पांढरा सिंह म्हटले जाते.तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा व्हिडीओ नेमका कोणत्या शहरातला आहे? तर हा व्हिडीओ भारतातील कोणत्याही शहरातला नाही तर थायलंडमधील एका पटाया शहरातील आहे.

civil service servants vehicle with a board coming to wrong side
चक्क अधिकाऱ्याच्या गाडीने मोडला वाहतूक नियम! भर रस्त्यावर थांबवताच पेटला वाद, पाहा VIDEO
Love Jihad
व्हायरल होत असलेला लव्ह जिहादचा तो व्हिडीओ…
girl playing holi with boyfriend while standing on moving scooter
चालत्या स्कुटीवर उभे राहून तरुणाला रंग लावत होती तरुणी! अचानक ब्रेक दाबला अन्…. व्हिडीओमध्ये बघा पुढे काय घडले
when woman walk on china streets wearing red saree
जेव्हा भारतीय तरुणी चीनमध्ये सुंदर लाल साडी नेसून फिरते… चिनी लोक पाहतच राहिले; पाहा व्हायरल व्हिडीओ

राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव आणि वनस्पती संवर्धन विभागानुसार सावंगजीत कोसूंगनर्न रत्चाबुरी भागात सिंह ठेवण्याची परवानगी होती पण मान्यतेशिवाय या सिंहाला दुसऱ्या ठिकाणी नेण्याची परवागनी नव्हती. या विभागाचे प्रमुख सांगतात, “या सावंगजीतने सिंहाला सार्वजानिक ठिकाणी नेणे आणि पूर्वपरवानगीशिवाय त्याला दुसऱ्या ठिकाणी हलवले त्यामुळे त्याने कायद्याचे उल्लंघन केले आहे. यासाठी त्याला सहा महिन्याचा तुरुंगवास किंवा १,१७६८८ रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. पुढे अधिक तपासानंतर असे समजले की व्हायरल व्हिडीओतील कार चालक हा सावंगजीतचा भारतीय मित्र आहे आणि पोलीस त्याचा शोध घेत आहे.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. Bangkokboy17 या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेक लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.