Shocking video: नवरा बायकोचं नातं हे विश्वास आणि प्रेमावर अवलंबून असतं. त्यातील एकानेही घराबाहेर दुसरं नातं बनवलं तर त्या नात्याला तडा जातो. गेल्या काही वर्षांपासून बदलेल्या जीवनशैली आणि नात्याकडे बघण्याचा दृष्टीकोन किंवा अजून काही…तो व्यक्ती घराबाहेर प्रेम शोधत…जेव्हा जी गोष्ट घरात कळते तेव्हा वाद, भांडण अगदी मारामारी पर्यंत गोष्टी जातात…नातं जपण्यासाठी प्रयत्नही केला जातो. पण नात्यामधील आलेल्या दरीमुळे ते नातं संपतं. लग्न आणि संसाराविषयी नवरा बायको दोघांनीही स्वप्न रंगवली असतात. पण दोघात तिसरा येतो तेव्हा या स्वप्नाना तडे जातात. अनेकजण आपलं लग्न झाल्यानंतरही दुसऱ्या व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवत असतात. तर सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक बायकोनं आपल्या नवऱ्याला प्रेयसीसह रंगेहाथ पकडले. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
उत्तर प्रदेशमधून अशीच एक घटना समोर आली आहे ज्यात पत्नीने पतीला आणि त्याच्या गर्लफ्रेंडला रंगेहात पकडल्याची माहिती आहे. मग काय, पत्नी कसली गप्प राहते तिने हाॅटेलच्या बाहेरच भररस्त्यातच पतीच्या प्रेयसीला मारहाण करण्यास सुरुवात केली. पत्नीने प्रेयसीचे केस पकडले, तिला बेदम मारहाण केली ज्यात तिचे कपडेही फाटल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पत्नीला माहिती मिळाली की, पती त्याच्या प्रेसयीसोबत एका हाॅटेलमध्ये थांबला आहे ज्यानंतर तिने दोघांना एक अनोखं सरप्राईज देण्याचा प्लॅन केला. पत्नीने गुपचूप जाऊन दोघांना रंगेहात पकडलं आणि हाॅटेलबाहेरच प्रेयसीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पत्नीचा राग इतका वाढला होता की ती कुणाचंही काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती.मिळालेल्या माहितीनुसा, ताजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टीडीआय मॉलच्या मागे असलेल्या एका हॉटेलबाहेर रस्त्याच्या मधोमध हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरु झाला. पत्नीने पतीला आणि प्रेयसीला एकत्र पाहताच तिचा राग अनावर झाला आणि शिवीगाळ करतच तिने प्रेसयीला मारहाण करण्यास सुरुवात केली. पत्नीने प्रेयसीचे केल पकडले, तिला जमिनीवर लोळवले आणि मग लाथा-बुक्क्यांनी तिला मारायला सुरुवात केली. यादरम्यान पतीने दोघींना वेगळे करण्याचा प्रयत्न केला पण पत्नी काही तिला सोडायला तयार नव्हती.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील @skrajeshsahu या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आयुष्य खूप छोटं आहे, विश्वास आणि प्रेमाने नाती जपा. जी व्यक्ती तिच्यावर प्रेम करते, विश्वास करते त्यांना कधीही दुखवू नका. धावपळीच्या आयुष्यात नात्याला वेळ द्या. एकमेकांना समजून सुसंवाद आणि वेळ दिल्याने नातं अधिक मजूबत होतं. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडीओवर येत आहेत.
