Shocking video: लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. चोरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे चोरी करण्यापूर्वी त्यांना कोणाचीही दया येत नाही, चोरी एक हजार रुपयांची असो वा एक कोटी रुपयांची, संधी मिळताच ते हात साफ करतात. नुकताच अहमदाबादमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल. तब्बल ५ लाख ५० हजाराची ही चोरी क्षणात कशी झाली तुम्हीच पाहा..
फोनचे व्यसन लोकांना इतके लागले आहे की प्रत्येक वेळी लोक आपल्या स्मार्टफोनला चिटकून असतात. नको त्या वेळी केलेला फोनचा वापर आपल्याला अडचणीत आणू शकतो. यामुळे आजूबाजूला काय चालू आहे यावर आपले लक्ष राहत नाही आणि परिणामी आपली मोठी फसवणूक होऊ शकते. अलिकडे अशीच एक घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे ज्यात फोनच्या नादात व्यक्तीचे लाखो रुपये चोरीला गेल्याचे दिसले. मुख्य म्हणजे त्याच्या मागून ही चोरी भररत्यात केली जात होती पण फोनच्या वापरामुळे व्यक्तीला याची कल्पना आली नाही .
ही अहमदाबादच्या माणिक चौकात घडल्याची माहिती आहे. यावेळी रसत्यावर लावण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेरात संपूर्ण घटना कैद झाली ज्यामुळे ही चोरी कशी झाली ते समोर आले. घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून यातील दृष्यांनी सर्वांनाच अवाक् केले आहे. यात दिसते की, एक व्यक्ती रस्त्यावरुन जात आहे, यावेळी त्याच्या पाठीवर एक पैशांनी भरलेली बॅग असते तर हातात फोन चालवत तो आपल्याच धुंदीत चालत असतो. याच परिस्थितीचा फायदा घेत एक चोर व्यक्तीच्या मागून चालायला सुरुवात करतो आणि संधी साधून शिताफिने त्याच्या बॅगेतून पैशांची गड्डी चोरतो.व्हिडिओत दिलेल्या माहितीनुसार, व्यक्ती एका सोन्या-चांदीच्या दुकानात काम करतो. तो ही रक्कम बॅगेत भरुन कुठेतरी घेऊन जात असतो आणि याचवेळी रस्त्यात या पैशांची लुट होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भररस्त्यात चोरी करुनही एकाही माणसाचे लक्ष चोरावर जात नाही. व्हायरल व्हिडिओनुसार, चोराने बॅगेतून साडे पाच लाखांची लूट केली.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
