Viral video: जंगलातील सर्वात मोठा शिकारी म्हणून सिंहाला ओळखलं जातं. त्याच्या हातात आलेली शिकार सहसा सुटत नाही. वाघ, बिबट्या यांसारखे भयानक प्राणी देखील सिंहाला घाबरतात. तुम्ही सिंहाने केलेल्या शिकारीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सिंहाच्या आयुष्यातले शेवटचे दिवस आणि त्याची अवस्था पाहून तुमच्याही पाया खालची जमीन सरकेल. म्हणूनच आयुष्यात कधीच ताकदीचा गर्व करू नका, एक दिवस असाही येतो. सिंहाची अवस्था पाहून म्हणाल आयुष्यात अंतिम सत्य हेच आहे.
असं म्हणतात पैसा, सौदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा असते. एक दिवस हे सगळं संपणार आहे हेच या व्हिडीओमधून समोर आलं आहे. लोकांना कायमच वन्य जीवनाविषयी कुतुहल असतं. प्राण्यांना पहायला आणि त्यांच्याविषयी जाणून घ्यायला अनेकजण तयार असतात. पण प्राण्यांचंही आयुष्य काहीसं आपल्यासारखंच असतं. जस माणसाला जगताना संघर्ष करावा लागतो तसंच प्राण्यांनाही रोजच्या आयुष्यात संघर्ष करावा लागतो. जन्म आहे तसा मृत्यू आहे तसंच प्राण्यांचंही आहे. तसे तर सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात. जंगलातील सर्व प्राणी ज्याला घाबरतात आणि सिंहाची गर्जना ऐकूनच ते प्राणी जंगलातून आपला मार्ग बदलतात. मात्र हाच सिंह म्हातारा झाल्यावर दुबळा होतो. सिंह हा जंगलाचा राजा आहे, हे सर्वांना माहीत आहे. सिंह, ज्याला राजा म्हटले जाते, त्याच्या शेवटच्या काळात अत्यंत वाईट परिस्थितीत पडतो आणि त्याच्याकडे म’रण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो. याचाच व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सिंह म्हातारा झाल्यामुळे त्याची अवस्था खूपच बिकट झाली आहे. त्याचं शरिर थकलं आहे, त्याला नीट चालताही येत नाहीये. त्याच्या शरिरावर काहीच मांस राहिलेलं नाहीये त्याच्या बरकड्या दिसत आहेत एवढा तो बारीक झाला आहे. एकेकाळी सिंहाचं नाव काढलं तरी इतर प्राणी लांब पळत असतील मात्र आता ही सिंहाची अवस्था पाहून त्याला कुणीच घाबरत नाहीये. म्हणूनच कोणत्याच गोष्टीचा गर्व करु नका शेवट प्रत्येकाचा येणारच आहे.
पाहा व्हिडीओ
हेह वाचा >> VIDEO: “नशिबापुढे मेहनतीचंही नाही चाललं” अवघ्या २ सेकंदात ‘या’ मुलासोबत जे झालं त्यावर विश्वास बसणार नाही
vip_thoughts99 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा असते”