Viral video: ‘जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर’; आपण जे वागतो, बालतो, तेच आपल्यासोबत घडतं हे आपण सगळ्यांनीच आतापर्यंत ऐकलं आहे. तुम्ही एखाद्याला त्रास दिला, तर तुम्हालाही कुणीतरी त्रास देईल किंवा तुम्ही एखाद्यासोबत चुकीचं केलं, तर उद्या किंवा एक दिवस तुमच्यासोबतही ते घडू शकतं. जसं करावं, तसं भरावं, अशी म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. अनेक जण दुसऱ्याचं वाईट चिंतायला किंवा करायला जातात आणि त्यांच्यासोबतच वाईट घटना घडते. याला आपण ‘जसे कर्म, तसे फळ‘, असे म्हणतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, एखाद्याचं आपण वाईट केलं, तर आपल्या बाबतीतही वाईटच घडतं. म्हणूनच आयुष्यात कधीच ताकदीचा गर्व करू नका. एका रिक्षाचालकानंही अशीच चूक केलीय. ती म्हणजे, एका वृद्ध पोलिसाला विनाकारण मारहाण.. याचा व्हिडीओ व्हायरल होत असून हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाईट वाटेल.
एखाद्याच्या हतबलतेचा फायदा घेऊ नये मात्र या रिक्षा चालकानं रस्त्यावरुन आपली सायकल घेऊन जाणाऱ्या एका वृद्ध पोलिसाच्या अक्षरश: कानशिलात लगावली आहे. पोलीसांची भीती आपल्या सगळ्यांनाच असते, त्यापेक्षा जास्त त्यांच्याप्रती आदर आपल्या प्रत्येकाच्याच मनात असतो. मात्र वृद्ध झालेल्या या पोलिसांना मारताना या रिक्षा चालकाला काहीच वाटलं नाही. राज्यातील वाढत्या गुंडगिरीवर अनेक प्रश्न उपस्थित करून, आसाममधील एका घटनेने लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक ऑटो चालक आक्रमकपणे एका वृद्ध वाहतूक पोलिसाला कानाखाली मारताना आणि मारहाण करताना दिसत आहे. वृत्तानुसार, ही घटना आसाममधील दिब्रुगढमधील नालियापूल बाजार परिसरात घडली. ही घटना दिवसाढवळ्या घडली, बाकीचे प्रवासी प्राणघातक हल्ला पाहत असताना. हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल होताच, स्थानिकांसह नेटकऱ्यांनीही दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: “अरेंज मॅरेज किती भीतीदायक आहे” भर लग्नात स्टेजवरच नवरदेवासोबत नवरीनं काय केलं पाहा
चालकाने वृद्धांसोबत केलेल्या गैरवर्तनावर बहुतांश लोकांनी टीका केली, तर उर्वरितांनी ऑटोचालकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. अनेकांनी या प्रकरणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्यातली एक प्रतिक्रिया सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. एका युजने प्रतिक्रिया देत म्हंटलंय की, “जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा असते”