Baby Stroller Metro Station Video: मेट्रो स्थानकावर रोज लाखो प्रवासी ये-जा करतात. गर्दी, गडबड आणि घाईगडबडीत एका क्षणाची चूकही कधी कधी मोठ्या दुर्घटनेचं रूप घेते. अशाच एका क्षणाच्या चुकीनं घडलेला हृदयद्रावक प्रसंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहताच प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो, कारण पुढच्याच क्षणी काय होणार याची कल्पनाही कोणी केली नव्हती.
मेट्रो स्थानकात बेबी ट्रॉली घसरली ट्रॅकवर… समोरून येत होती ट्रेन!
ही घटना एका मेट्रो स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजमधील आहे. व्हिडीओमध्ये दिसतं, दोन मुली एका छोट्या बाळासह प्लॅटफॉर्मवर उभ्या आहेत. त्यांच्या जवळच बाळाची बेबी ट्रॉली (स्ट्रॉलर) ठेवलेली असते. काही क्षणांतच ट्रॉली थोडी हलते… हळूहळू सरकते… आणि कोणाच्याच लक्षात न येता ती स्थानकाच्या कडेला पोहोचते.
क्षणातच पुढचं दृश्य अंगावर शहारे आणणारं!
ट्रॉली कड्यावरून थेट मेट्रो ट्रॅकवर कोसळते आणि त्याच वेळी समोरून मेट्रो ट्रेन धावत येताना दिसते.
पाहणाऱ्यांच्या डोळ्यासमोर भीषण क्षण; लोकांनी ठोकल्या आरोळ्या!
हे दृश्यं पाहून स्थानकावरील लोक किंचाळतात. सगळ्यांना वाटतं ट्रॉलीमध्ये बाळ आहे आणि ते थेट ट्रेनखाली जाणार. क्षणभरात सगळे प्रवासी ट्रॅकच्या दिशेने धाव घेतात, काही जण आरडाओरडा करत मदत मागतात. परंतु, पुढच्या क्षणात उलगडतं सत्य. ट्रॉली रिकामी असते. बाळ दुसऱ्या महिलेच्या कुशीत सुरक्षित असतं. क्षणभरासाठी सगळ्यांची धडधड थांबते, पण जेव्हा कळतं की बाळ सुरक्षित आहे, तेव्हा सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला.
सुरक्षाकर्मींची तत्परता, टळला मोठा अपघात
मेट्रो सुरक्षारक्षक तात्काळ घटनास्थळी पोहोचतात. त्यांनी ट्रॅकवरील ट्रॉली बाजूला करून मेट्रो सेवेवर परिणाम होऊ न देण्याची काळजी घेतली. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला असून लोकांनी कमेंटबॉक्समध्ये मिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
“देवाचे आभार, बाळ ट्रॉलीत नव्हते!” युजर्सचा दिलासा
एकाने लिहिलं, “देवाचे आभार, बाळ ट्रॉलीत नव्हतं. नाहीतर काय घडलं असतं, कल्पनाही करवत नाही.”
तर दुसऱ्याने लिहिलं, “फक्त एका क्षणाचा निष्काळजीपणा, किती मोठं संकट ओढवू शकतं याचं जिवंत उदाहरण!”
एक धडा, “थोडी सावधगिरी हजार संकटांपासून वाचवते.”
हा प्रसंग आपल्याला आठवण करून देतो मेट्रोसारख्या सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः लहान मुलांसोबत असताना, फक्त एक क्षणाची खबरदारी संपूर्ण आयुष्य वाचवू शकते.
येथे पाहा व्हिडीओ
एका ट्रॉलीनं काही सेकंदात सगळ्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले… आणि पुन्हा एकदा सिद्ध केलं, लापरवाही क्षणभराची असते, पण तिचा परिणाम कायमचा असू शकतो.
