Shocking video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे खरे असतात, तर काही व्हिडीओ हे मनोरंजनासाठी तयार केले गेल असतात. पण सध्या समोर आलेला व्हिडीओ हा अगदी खरा असल्याचं सांगितलं जात आहे. प्रत्येक नात्यामध्ये प्रेम आणि विश्वास महत्त्वाचा असतो. चांगलं नातं निर्माण करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला खूप मेहनत घ्यावी लागते, नात्यामध्ये प्रामाणिकपणा असावा लागतो. मात्र आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये नवऱ्याने त्याच्या बायकोला तिच्या बॉयफ्रेंडसोबत रंगेहात पकडलं आहे. ही घटना मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये घडून आली. नाईट ड्युटीसाठी घरातून बाहेर पडताच पतीला रस्त्यात पत्नी भेटली, पण यावेळी ती एकटी नव्हती तर आपल्या बाॅयफ्रेंडसोबत मोमोज खाण्यात ती मग्न होती. पत्नीला असं दुसऱ्या पुरुषांसोबत रंगेहात पकडल्यानंतर पतीला आपला राग अनावर झाला आणि त्याने भररस्त्यात काय केलं पाहा.
गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहेत. शहर असो किंवा गाव याठिकाणी असे विवाहबाह्य संबंध आढळून येतं आहे. यामागील कारणं वेगवेगळी आहेत. अनेक वेळा प्रेम विवाहाला विरोध म्हणून दुसऱ्यासोबत लग्न लावून देण्यात येतं. तर कधी कधी नवरा बायकोमधील नातं प्रेमापर्यंत पोहोचत नाही, शरीरसुखासाठी अनेक जण बाहेर जातात. विवाह हा विश्वास आणि प्रेम यावर आधार नातं आहे. यातील विश्वासच गेला तर त्या नात्याला अर्थ उरत नाही. दरम्यान मध्य प्रदेशच्या भोपाळमधील एका महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर एक वेगळाच राडा झाला आहे.
घरातून खोटं कारण सांगून पत्नी घराबाहेर पडली पण काही क्षणातच तिचं भांड उघडं पडलं. पतीने रस्त्यातच पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत मोमज खाताना पकडलं ज्यानंतर जोरदार तांडव सुरु झाला. ही घटना भोपाळच्या अशोका गार्डन पोलिस ठाण्याच्या परिसरात घडून आली. मिळालेल्या माहितीनुसार, पती नेहमीप्रमाणे नाईट ड्युटीसाठी घरातून निघाला. वाटेत भूक लागल्याने त्याला मोमोजचा एक स्टॉल दिसला आणि त्याने आपल्या मित्राला गाडी थांबवायला सांगितले. मोमोजच्या स्टाॅलजवळ जाताच पतीला असं काही दिसलं ज्याने त्याचे डोळे खुलेच्या खुलेच राहिले. पतीने पाहिले की मोमोजच्या स्टाॅलवर त्याची पत्नी वेगळ्या पुरुषासोबत मोमज खात आहे.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे, तसेच हा खरा आहे की तो बनवला गेला आहे. हे कळू शकलेलं नाही. मात्र नेटकऱ्यांनी नवऱ्यासाठी दु:ख व्यक्त केलं आहे.
