Railway accident Viral video: रेल्वे प्लॅटफॉर्मवर चढताना ट्रेनमधून पडणाऱ्या प्रवाशांचा व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतो भारतीय रेल्वे नेहमी सर्व प्रवाशांना सल्ला देते की कधीही चालत्या ट्रेनमध्ये चढू नये, अन्यथा ते अपघाताला बळी पडू शकतात. मात्र तरीही प्रवाशी या नियमांकडे दुर्लक्ष करून चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. वारंवार आवाहन केलं जात असलं तरी काही महानग असे असतात जे यातून कोणताही धडा घेत नाहीत आणि आपला जीव धोक्यात घालतात.कधी कधी ते मोठ्या अपघाताला बळी पडतात आणि मृत्यूही पत्करतात. सध्या अशीच एक रेल्वे स्थानकावरील घटना समोर आलीय. ज्यामध्ये एका एक व्यक्ती अक्षरश: प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील अंतरात अडकून शेवटी रुळावर पडली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याचा व्हिडीओ ओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण जवळपास प्रत्येकाने वाचले आहे. कारण- घाई करताना अपघात होण्यापेक्षा संथ गतीने सुखरूप घरी पोहोचलेले बरे, हा या वाक्यामागचा मुख्य उद्देश आहे. तरीदेखील काही मंडळी या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात अन् पुढे त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागते. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे.
मध्य प्रदेशच्या भोपाळ रेल्वे स्टेशनवर भयंकर अपघात झाला. धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात तरुण गंभीर जखमी झाला. ३१ मार्चच्या रात्री घडलेल्या या घटनेचा १४ सेकंदांचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आले आहे. धावत्या ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मधोमध हा तरुण अडकतो आणि खाली जातो. या भयंकर अपघातामध्ये तरुण एक तरुण गंभीर जखमी झाला. या तरुणाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर भोपाळच्या हमीदिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, प्लॅटफॉर्मवरून ट्रेन जात असते आणि एक तरुण ही धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतो. ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात त्याचा हात सटकतो आणि तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधोमध अडकतो. यावेळी हा तरुण जवळपास चार ते पाच वेळा गोल गोल फिरत ट्रेनखाली जातो. ५ सेकंद हा तरूण ट्रेनसोबत फरफटत जातो. ही संपूर्ण घटना पाहून प्लॅटफॉर्मवर असलेल्या प्रवाशांचाही थरकाप उडतो.
पाहा व्हिडीओ
एवढा भयंकर अपघात पाहून तुम्हीही यापुढे रूळ ओलांडण्याआधी आणि चालत्या गाडीत चढण्याआधी १०० वेळा विचार कराल. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी उशीर झालाय आणि तुम्ही जर वेळेत पोहोचण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्याचा शॉर्टकट घेत असाल, तर स्वत:ला आवरा आणि थांबा. कारण- काळ कुणाला सांगून येत नसतो. तो कधीही आपल्या वाटेत येऊन आपला जीव घेऊ शकतो आणि आपल्याला हे सुंदर जीवन जगण्याचा आनंद गमवावा लागू शकतो.
