Viral video: सोशल मीडियावर व्हायरल होण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की लोकांना काहीही करून व्हायरल व्हायचे आहे. त्यासाठी स्वत:चा व इतरांचा जीव पणाला लावावा लागला तरी चालेल. रील माफियांना पोलिस आणि कायद्याची भीती तर नाहीच पण आपला जीव गमवावा लागण्याचीही भीती राहिलेली नाही. अशा परिस्थितीत लोक कार आणि बाइकवर धोकादायक स्टंट करतात. यावेळी ते केवळ स्वतःचा जीव धोक्यात घालत नाहीत, तर असे लोक इतरांच्या जीवाशीही खेळतात.असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती कोणत्याही सुरक्षेशिवाय पुलावरुन उडी मारतो आणि पुढे भयंकर घडतं. रील बनवण्यासाठी तरुणाची ही स्टंटबाजी सुरु होती. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पाहून तुमचाही थरकाप उडेल.

काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्रविचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशी सुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण एका पुलावर उभा आहे आणि पुलाखालून मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक सुरु आहे. यावेळी हा तरुण कोणत्याही सुरक्षेशिवाय थेट एका खांबावर उडी मारतो मात्र त्याचा तोल जातो आणि तो थेट खाली कोसळतो. त्याचा हा स्टंट चांगलाच फसलेला दिसत आहे कारण खांबावर आपण सहज पोहचू असं वाटत असताना तरुण थेट खाली कोसळतो. रिलसाठी स्टंटबाजी करणं अशाप्रकारे जीवावरही बेतू शकतं त्यामुळे व्हिडीओ, रिल्ससाठी स्वत:च्या आणि इतरांच्या जीवाशी खेळू नका.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Shocking: अंबरनाथमध्ये तरुणाला ट्रकनं उडवलं; मृत्यू अक्षरश: कट मारून गेला, VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कोणाची?

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

@crazyclipsonly नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत १७ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर हजारो लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे. अशा परिस्थितीत युजर्स व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत. एका युजरने लिहिले, “अशा लोकांना फक्त पोलीस लाठीमारच सुधारू शकतात.” तर आणखी एकानं म्हंटलं की, “आयुष्य एवढं सहज मिळतं का ?”