Accident video: सोशल मीडियावर दररोज अपघातांचे वेगवेगळे व्हिडीओ समोर येत असतात. काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात; तर काही अपघात दुसऱ्याच्या चुकीमुळे घडून येतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे. ‘अतिघाई संकटात नेई’, असे म्हणतात. याचाच प्रत्यय हा व्हिडीओ पाहून आला आहे. काही वेळा लोक घाई-गडबडीत अशा चुका करतात की, ज्याचा त्यांना नंतर पश्चात्ताप होतो. जगात रोज कुठे ना कुठे अपघात होत असतात. वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते, तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडतातात. मात्र, समोर आलेल्या अपघातात अतिघाई अंगलट आली आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सिलिंडरची गाडी उभी आहे. यावेळी काही सिलिंडर खाली ठेवले आहेत तर काही सिलिंडर खाली उतरवत आहेत. याचवेळी एक सिलिंडर खाली पडतो आणि मागून सगळेच सिलिंडर पडतात आणि मोठा स्फोट होतो. यावेळी एक माणूस इकडे तिकडे पळताना दिसत आहे.
इंडोनेशियातील जांबी प्रांतातील सुंगाई पेनुह येथे एलपीजी सिलिंडर अनलोडिंगदरम्यान झालेल्या स्फोटात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. नियमित कामकाजादरम्यान घडलेल्या या घटनेमुळे औद्योगिक सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिलिंडर खाली उतरत असताना अचानक स्फोट झाला. या स्फोटाचा परिणाम मोठा होत परिसरात घबराट निर्माण झाली आणि जवळ असलेल्या व्यक्तीला गंभीर भाजल्या गेल्या. या घटनेमुळे एलपीजी हाताळणीतील सुरक्षा नियम, प्रशिक्षण आणि उपकरणांची स्थिती याबाबत चर्चा सुरू झाली आहे. अशा प्रकारच्या धोकादायक कामांमध्ये अधिक दक्षता आणि सुरक्षितता उपाययोजना आवश्यक असल्याचे अधोरेखित होत आहे. सध्या जखमी व्यक्तीवर उपचार सुरू असून संबंधित प्रकरणाची चौकशी केली जात आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक सुरक्षा मानकांची अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ dcnmaharashtra_marathi नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
