Shocking video: सोशल मीडिया हे असे प्लॅटफॉर्म आहे जिथे एखाद्या गोष्टीची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. सोशल मीडियावर व्हिडिओ एका झटक्यात व्हायरल होतात. आतापर्यंत सोशल मीडियावर तुम्ही तरुण आणि तरुणी, महिला आणि पुरुष यांच्या मारामारीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्याचे पाहिले असेल. सध्या सोशल मीडियावर तरुण मुलींच्या हाणामारीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.मुंबई लोकल ट्रेनमधील सीटवरुन महिलांमधील हाणामारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप गाजतात. अशा व्हिडीओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळतात. सध्या व्हायरल झालेला व्हिडीओमध्ये दोन तरुणींची भरदिवसा जबरदस्त हाणामारी पाहिला मिळते. इलेक्ट्रिक एस्कलेटवर या तरुणींची तुफान हाणामारी सुरु आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर तुफान गोंधळ घातला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, मेट्रो स्टेशनच्या एस्कलेटवरुन काही लोक चालले आहेत. यावेळी दोन तरुणींमध्ये किरकोळ वादावरुन शाब्दिक बाचाबाची सुरु आहे. परंतु काही तासांतच या वादाचे रुपांतर हाणामारीत होते. एक तरुणी दुसऱ्या तरुणीला खाली ढकलून देते. यामुळे तरुणी संतापून दुसऱ्या तरुणीचे केस पकडून ओढू लागते. दुसरी देखील कमी नसते. तीही तिचे केस पकडून ओढू लागते. लाथाबुक्क्या मारते. दोघीही एकमेकांनी सोडायला तयार नसतात. हा प्रकार पाहून आजूबाजूचे प्रवासीही गोंधळात पडलेले दिसत आहेत.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
पाहा व्हिडीओ
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ केवळ काही सेकंदाचाच आहे, परंतु याने सोशल मीडियावर तुफान गोंधळ घातला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Shunyta_007 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या घटनेबद्दल संताप व्यक्त होत असून नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहेत.
