New bike Fire On Road: बाईक अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. तरूणाईमध्ये या बाईकची क्रेझ दिसते. अनेकजण आपल्या बाईकला एवढं जपतात की त्यावर आलेला एक ओरखडाही त्यांना सहन होत नाही. पण सध्या एक व्हीडिओ वाऱ्या सारखा व्हायरल होतोय. यात नव्या कोऱ्या बाईला आग लागलेली पाहायला मिळतेय.ही गाडी खरेदी करण्याची अनेकांची इच्छा असते. पण तिची किंमता पाहता अनेकांच्या खिश्याला ती परवडत नाही. त्यामुळे अनेकांचं स्वप्न अधुरं राहतं. पण ही आपली स्वप्नवत गाडी डोळ्यासमोर जळून खाक झाली तर…? ही कल्पना करणंही अनेकांना परवडणारं नाही. आतापर्यंत आतापर्यंत आपण अनेक चारचाकी गाड्यांना, इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याच्या घटना पाहिल्या आहेत. पण बाईकला लागलेली आग ही दुर्मिळ घटना आहे. भर दुपारी एका नव्या कोऱ्या बाईकला भीषण आग लागली. याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय.

सध्या उन्हाळ्याचा हंगाम आहे, देशाच्या प्रत्येक भागात तीव्र उष्णतेचा परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत या आगीपासून कोणीही सुरक्षित नाही. मानव, प्राणी, झाडे, वनस्पती सर्व उष्णतेचे बळी आहेत. याशिवाय उष्णतेमुळे वाहनांनाही दररोज आग लागल्याच्या घटना समोर येत आहेत.असाच आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहे, ज्यामध्ये उष्णतेमुळे एका बाईकला अचानक आग लागली आणि ती जळू लागली.

बाईकबरोबरच तरुणही भाजला

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, बाईकस्वाराच्या बाईकमधून धूर कसा निघतोय हे दिसत आहे. बाईकमधून धूर निघत असल्याचे पाहून तिथे उपस्थित लोकांनी बाईकवर पाणी ओतण्यास सुरुवात केली. अशा स्थितीत दुचाकीस्वारही त्याच्या दुचाकीकडे धूर कुठून येत आहे ते जवळून पाहण्याचा प्रयत्न करतो. तो बाईक जवळून पाहू लागताच बाईकमध्ये अचानक स्फोट होतो आणि बाईक पेटू लागते. या अपघातात दुचाकीस्वारही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडतो. त्याच्या संपूर्ण शरिराला आग लागते, अशा परिस्थिती तो रस्त्यावरच इकडे तिकडे पळू लागतो. शेवटी त्याचं आगीमुळे संपूर्ण शरीर भाजते अन् तो रस्त्यावर कोसळतो. पुढे व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पोलीस आणि काही लोक या तरुणाला उचलून घेऊन जातात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: आईच्या कुशीतून बाळ बाल्कनीत पडलं; लोकांचे टोमणे अन् सोशल मीडियावर ट्रोल केल्यानं आईनं जीवन संपवलं

याआधीही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात उष्णतोमुळे वाहनांना आग लागते. त्यामुळे उन्हाळ्यात या सर्व गोष्टींबाबत प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. @Info_4Education नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, तो आतापर्यंत २ लाख ८० हजार वेळा पाहिला गेला आहे, तर व्हिडिओला हजारो वेळा लाईकही करण्यात आले आहे. यूजर्स या व्हिडिओवर कमेंटही करत आहेत. एका यूजरने लिहिले “हे कसले लोक आहेत, जळत्या माणसाला वाचवण्याऐवजी त्याच्यावर पाणी फेकत आहेत.” दुसऱ्या युजरने लिहिले, “व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीची चूक आहे, त्यानेच टाकी उघडण्यास सांगितले.” तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “बरीच दुकाने आहेत, कोणाकडेही अग्निशामक यंत्रणा नाही, हे आश्चर्यकारक आहे.”