Shocking video: आजकाल तरुणांमध्ये रील्स बनवण्याची प्रचंड क्रेझ आहे. ते कुठेही असले तरी, जे काही करत आहेत ते ते कॅमेऱ्यात कैद करतात आणि नंतर ते विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करतात. त्यांना रील्स बनवण्याचे इतके वेड आहे की कधीकधी ते अशा गोष्टी करतात ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो.डोंगर, दऱ्या आणि नद्यांचे सौंदर्य पाहायला कोणाला आवडतं नाही. धबधब्यांवरून कोसळते पाणी आणि आकाशातील ढगांना स्पर्श करणाऱ्या डोंगरांमध्ये सुट्ट्या घालवण्याची एक वेगळीच मज्जा असते पण फोटो, रिल्स बनवण्याच्या नादात तरुणाई हरवून गेली आहे. जीवाची पर्वा न करता रिल्स बनवताना दिसत आहे.
सोशल मीडियावर लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करण्याची तयारी दाखवतात. बऱ्याचदा लोक यासाठी आपल्या जीवाची देखील पर्वा करत नाही. हीच हिरोगीरी कधीकधी जिवावरही बेतत. असाच एक समुद्रातील व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही समुद्रात असं धाडस करताना दहा वेळा विचार कराल.
नेमकं काय घडलं?
एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ बनवताना एक मुलगी मृत्यूच्या तोंडातून कशी थोडक्यात बचावते हे व्हिडिओमध्ये दाखवले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगी समुद्रकिनाऱ्यावरील एका मोठ्या खडकाजवळ उभी राहून व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसत आहे. यावेळी समुद्रात जोरदार लाटा उसळू लागतात. तरीही, ती सावध होत नाही आणि व्हिडिओ बनवत राहते. मात्र पुढच्या काही क्षणातच एक मोठी लाट येते आणि मुलीला घेऊन जाते. दरम्यान ती मुलगी जवळच असलेल्या दुसऱ्या दगडाला धरते, ज्यामुळे तिचा जीव वाचतो. पण या काळात तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये भीती निर्माण होते.
पाहा व्हिडीओ
https://twitter.com/virjust18/status/1908138293012598959
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @virjust18 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने म्हटले की, “हे लोक मूर्ख आहेत. त्यांच्यामुळे कुटुंबातील सदस्य रडत असतील.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “आजकाल सगळे आकाशात उडत नाहीत तर सोशल मीडियावर उडत आहेत.” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “ही एक विचित्र परिस्थिती आहे, काहीही झाले तरी रील बनवायचा हट्ट.”