Metro fight video: ट्रेन असो वा मेट्रो, लोक कधी कधी सीटसाठी भांडत असतात. त्याचे व्हिडीओही व्हायरल होतात. ऑफिसला जाण्यासाठी मेट्रोमध्ये चांगलीच गर्दी असते अशा वेळीही सीटसाठी भांडणे होतात. काही लोकतर बसण्याच्या जागेवर बॅग्स आणि इतर सामान ठेवतात आणि त्यामुळे इतर प्रवाशांशी भांडणे होतात. असाच एक भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका मेट्रोमध्ये दोन तरुणींची भयंकर पद्धतीनं हाणामारी झालीय. दिल्ली मेट्रोमध्ये हाणामारी ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. मेट्रोचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. आता मेट्रोमध्ये दोन तरुणींमधल्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सध्या असाच एक मेट्रोमधला भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये तरुणींची हाणामारी आणि आक्रमकता पाहून तुम्हालाही धडकी भरेल. व्हिडीओ पाहून शेवटी तुम्हीच सांगा यामध्ये नेमकी चूक कुणाची आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मेट्रोमध्ये प्रचंड गर्दी दिसत आहे. नीट उभं राहायलाही जागा दिसत नाहीये, अशातच काही वेळात तरुणींमध्ये तुफान हाणामारी सुरु होते. या मारामारीचं स्वरुप इतकं गंभीर आहे की, यामध्ये एखाद्याचा जीव जाऊ शकतो. यात दोन्ही तरुणी एकमेकींना केसाला धरुन बेदम मारत आहेत. अक्षरश: या एकमेकींचे केस ओढून कानाखाली मारत आहेत, गळा पकडत आहेत. व्हिडिओत हाणामारी पाहून प्रवाशी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र काही केल्या त्या ऐकत नाही. तुम्हीच सांगा यामध्ये नेमकी चूक कुणाची आहे.

मेट्रो ट्रेन आणि सकाळची वेळ म्हटल्यावर त्यात मोठी गर्दी जमा होते. सर्वच व्यक्ती मेट्रो ट्रेनच्या दिशेने धाव घेतात. गर्दीच्यावेळी नाही म्हटलं तरी एकमेकांना धक्का लागतो. यामध्ये प्रवाशांनी एकमेकांना समजून घेणं महत्वाचं आहे. मात्र गर्दीच्यावेळी धक्का लागल्यावर अनेक प्रवाशी आक्रमक होतात आणि भांडण करण्यास सुरुवात करतात. दिल्ली मेट्रोत सातत्याने अतरंगी घडना घडतात. 

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही काळजात धस्स होईल. नेटकऱ्यांना ही घटना अजिबात आवडलेली नाही. त्यांनी यासंबंधीच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नोंदवल्या आहेत. एकानं म्हंटलंय, “खूप भीषण आहे हे सगळं” तर आणखी एका एका युजरने महिलांच्या हिंसक हाणामारीवर प्रतिक्रिया देत “बापरे जीव जाईल तिचा” अशी प्रतिक्रिया दिलीय.