Viral video: आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात, असं म्हटलं जातं. एकीकडे ते आपल्या प्रत्येक सुख-दुःखात आपल्या सोबत असतात तर दुसरीकडे मस्ती करण्यातही तितकेच पुढे असतात. काही अगदी बॉडीगार्डप्रमाणे सतत आपल्या आजूबाजूला असतात तर काही लोकांमध्येही आपली मस्करी करण्याची संधी सोडत नाहीत. लग्नात तर मित्र अगदी विचित्र मस्करी करताना दिसतात. अनेकदा य मित्रांचे कारनामे सोशल मीडियावर व्हायरल होतात, असाच एक लग्नातील कारनामा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये नवरदेवाच्या मित्रांमुळे चक्क लग्न मोडलं आहे. नवरदेवाच्या मित्रांनी नवरीच्या मेत्रीणींसोबत असं काही केलं की थेट लग्न मोडलं आहे.

उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये एका नवरीने तिचे लग्न मोडून लग्नाची मिरवणूक परत आणली. हा प्रचंड वाद कॅमेऱ्यात कैद झाला आहे आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये फाटलेल्या कपड्यांसह लोक समारंभात दगडफेक करताना दिसत आहेत.हरिद्वारमधील एका लग्नात नवरी आणि नवऱ्याच्या बाजूने झालेल्या भांडणामुळे गोंधळ उडाला. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून नवरदेव आपल्या लग्नाच्या मिरवणुकीसह नुकताच लग्नस्थळी दाखल झाला होता, तेव्हा त्याच्या काही मित्रांनी नवरीच्या मैत्रीणींबद्दल अश्लिल टिप्पणी केल्याचा आरोप आहे.नवरीच्या बाजूने या प्रकाराला तीव्र विरोध केला, त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद सुरू झाला. लवकरच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, त्यानंतर खुर्च्या फेकण्यात आल्या आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या हाणामारीत अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

हरिद्वारमधील एका बँक्वेट हॉलमध्ये ही घटना घडली, त्यानंतर कार्यक्रमस्थळाचे युद्धभूमीत रूपांतरित झाले. वृत्तानुसार, दगडफेकही करण्यात आली आणि या घटनेत १० हून अधिक लोक जखमी झाले. ही संपूर्ण घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ

पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले होते परंतु गोंधळ पाहून ते निघून गेले. ते पोहोचेपर्यंत, बहुतेक लोक आधीच पळून गेले होते. आतापर्यंत, दोन्ही बाजूंनी कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही. या प्रकरणासंदर्भात दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल केल्यास ते चौकशी सुरू करतील असे पोलिसांनी सांगितले आहे.