सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही आश्चर्यचकीत करणारे असतात तर काही धक्कादायक असतात. असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीमध्ये नुकताच बांधण्यात आलेला रस्ता लोकांनी थेट हाताने उचलताना दिसत आहे. सध्या या व्हिडीओची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
हा व्हिडीओ जालना जिल्ह्यातील आहे. व्हिडीओमध्ये ग्रामस्थांनी कंत्राटदार राणा ठाकूर याच्यावर रस्त्याच्या बांधकामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.




हेही वाचा : हौस असावी तर अशी! ज्या रंगाची पगडी त्याच रंगाची खरेदी करतो Rolls Royce कार, वाचा ‘या’ भारतीय सरदाराविषयी…
व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की दोन तीन ग्रामस्थ नव्याने बांधण्यात आलेला रस्ता चटईप्रमाणे हाताने उचलत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येणार. व्हिडीओमध्ये दिसते की चटईवर डांबर टाकून हा रस्ता तयार करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थ संतापल्याचे दिसत आहे.
हेही वाचा : MS Dhoni च्या नावाने मुंबई ट्रॅफिक पोलीस करीत आहेत लोकांना सतर्क, वाचा काय आहे प्रकरण, पाहा व्हायरल पोस्ट
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. निकृष्ट बांधकामाबाबत सोशल मीडियावर असे अनेक प्रकरणे व्हायरल होत असतात मात्र हा व्हिडीओ राज्यातील जालना जिल्ह्यातील असल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.