Shocking video: सध्या एस्कलेटर म्हणजेच सरकते जिने सर्रास पाहायला मिळतात. पूर्वी जेव्हा एस्कलेटर भारतात दाखल झाले तेव्हा एखादी जादू बघावी तसे लोक या जिन्यांकडे पाहायचे. त्यावर पाय टाकताना गोंधळून कित्येकांचं कंबरडं मोडलं असेल याची गीणतीच नाही.पण आता आपल्याला या जिन्यांची हळूहळू सवय होऊ लागली आहे. ७-८ वर्षाचं चिमुरडं पोर अगदी सहज एस्कलेटरवर पाय टाकून युद्ध जिंकल्याचा अविर्भाव चेहऱ्यावर आणतं. आपण सर्वांनीच तंत्रज्ञानाला आपल्या जीवनाचा एक भाग बनवला आहे. आपल्याला जेवढ्या सुविधा मिळतील तेवढ्या नेहमी कमीच वाटतात.मात्र याच सुविधा कधी कधी आपल्या जिवावर बेतू शकतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. एक महिला आपल्या बाळासोबत एस्कलेटवर चढत असताना तिचा तोल गेला अन्… पाहा नेमकं काय घडलं?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक आई आपल्या बाळासह एस्कलेटवर चढत होती. याच वेळी तिचा पाय घसरला. आई बाळासह खाली पडली असती. तिने स्वतला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु तिच्या हातात बॅग असल्याने तिला काही करता येत नव्हते ती पाठीमागे कोसळू लागली. पण याच वेळी कर्तव्यावर असलेले एएसआय दुर्गा प्रसाद यांनी चपळाईने धाव घेतली. त्यांना आई आणि बाळाला घट्ट धरले आणि सुरक्षितपणे वर नेले. दुर्गा प्रसाद यांच्या तत्परतेमुळे आई आणि बाळा दोघेही थोडक्यात बजावले.

मेट्रो, मॉल असो की एखादे मोठे हॉटेल आजकाल सरकते जिने जवळपास सर्वच ठिकाणी पाहायला मिळतात. सुरुवातीला या सरकत्या जिन्यांवर पाय ठेवायलाही घाबरणारी मंडळी. आता चांगलीच सरावली आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच नागरिक सरकत्या जिन्याचा उपलब्धतेनुसार लाभ घेतात. त्यामुळे जिन्यांवरुन चालण्याचा त्रास वाचतो. खास करुन गर्भवती महिला, वृद्ध लोक आणि लहान मुले यांना त्याचा फायदा अधिक. पण हाच सरकता जिना जिवघेणाही ठरु शकतो हे या व्हिडीओतून कळतं.

पाहा व्हिडीओ

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर दुर्गा प्रसाद यांच्यावर नेटकऱ्यांनी कौतुकांचा वर्षाव केला आहे.