Viral video: एखाद्या वाहनचालकानं थोडाही नियम चुकवला, की वाहतूक पोलीस कायद्याचा बडगा उगारीत त्यावर दंडात्मक कारवाई करतात. पोलीस वारंवार नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत असतात. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करत वाहतुकीचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करत असतात. मात्र नागरिकांकडून नियमांचं पालन करण्याची अपेक्षा असताना मात्र पोलीसच कायदा मोडत असतील, तर त्यांच्यावर कोण कारवाई करणार, हा खरा प्रश्न आहे. ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करणं हे प्रत्येक वाहन चालकासाठी बंधनकारक आहे. वाहतूकीचे नियम न पाळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. मात्र काहीवेळा वाहतूकाचे नियम मोडणारेच पोलिसांसमोर आडीबाजी करतात. अशावेळी वाद होतात आणि त्याचे परिणाम चुकीचे होतात. दरम्यान आता पुन्हा एका वाहतूक पोलीस चर्चेचा विषय बनलेत. यामध्ये पोलीसांवर आरोप केले आहेत.
वाहतूक नियमानुसार दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं बंधनकारक आहे. आणि जर कोणी हेल्मेट घातलेलं नसेल, तर त्याला एक हजार रुपयांचा दंड आकारला जातो. पण इथे तर पोलीस जबरदस्ती करत आहेत.जे लोक हेल्मेट घालून होते, त्यांनाही थांबवून त्यांच्या डोक्यावरचं हेल्मेट काढून घेतलं जातंय. आणि त्यांनाच दंड भरायला लावला जातोय. जमशेदपूरमधील हा प्रकार सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. आता हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा अशा बेशिस्त पोलिसांचं करायचं तरी काय?
ही घटना झारखंडमधील जमशेदपूर शहरात सिदगोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २८ नंबर रस्त्यावर घडलीआहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचं नाव प्रदीप पीयू असून तो जमशेदपूरमधील न्यू बारीडीह भागात राहतो. प्रदीप टाटा स्टील कंपनीत कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. ट्रॅफिक पोलिसांकडून हेल्मेट तपासणी सुरू होती. यावेळी प्रदीप पीयूला थांबवण्यात आलं. मात्र प्रदीपनं हेल्मेट घातलेलं होतं, त्यामुळे “मग मला का थांबवलं?” असा प्रश्न त्यानं पोलिसांना विचारला.या प्रश्नावरून त्याचा पोलिसांसोबत वाद झाला. या वादात एका पोलिसानं त्याच्या दुचाकीची चावी काढण्याचा प्रयत्न केला, पण प्रदीपनं ती देण्यास स्पष्ट नकार दिला.यानंतर पोलिसानं चक्क त्याच्या डोक्यावरचं हेल्मेट काढलं आणि दुसऱ्या पोलिसानं “विना हेल्मेट बाईक चालवतोय” या आरोपाखाली त्याचा फोटो काढला.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @sohansingh05 नावाच्या एक्स काऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक वेगवेगळ्या प्रतक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय “ मागे मला अडवल ३ सीट घेऊन होतो म्हणून पण बाजूने ४ सीट घेऊन जाणाऱ्या रिक्षांवर कारवाई करा म्हटल्यावर न ऐकल्यासारखं केलं.” अशी प्रतिक्रियाही व्हिडीओवर आली आहे. तर आणखी एकानं, “पोलीसच असं करायला लागले तर इतर लोक काय करणार” अशी प्रतिक्रिया दिली आहे.