Shocking video: नातेसंबंधाला तडा जाणारी घटना समोर आली आहे. सासरे हे वडिलांच्या जागी असतात, पण उत्तर प्रदेशातील या घटनेने सर्वांना धक्का बसलाय. उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एका घराबाहेर एक वृद्ध व्यक्ती आपल्या सुनेला मारहाण करत असल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ही घटना चकेरी भागातील असल्याचे सांगितले जात असलेल्या या फुटेजमध्ये एक हिंसक कौटुंबिक वाद चित्रित झाला आहे, ज्यामुळे महिलांची सुरक्षा आणि कौटुंबिक हिंसाचाराबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
व्हायरल क्लिपमध्ये एक वृद्ध व्यक्ती एका महिलेला जबरदस्तीने घराच्या गेटकडे ओढताना दिसत आहे, तर ती रडत आहे आणि घरात परत पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वांसमक्ष तो व्यक्ती तिला मारहाण करत असताना, ती महिला मदतीसाठी याचना करत असल्याचे ऐकू येते. या भांडणादरम्यान काही शेजारी मध्यस्थी करताना दिसतात, तर इतर जण आपल्या फोनमध्ये ही घटना रेकॉर्ड करतात. यावर अनेकांनी तात्काळ कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
स्थानिक वृत्तांनुसार, आरोपीची ओळख चकेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंद नगर येथील रहिवासी सुशील दुबे अशी पटली आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी महिला त्याची सून, मीनाक्षी पांडे असल्याचे सांगितले जात आहे, जी मूळची प्रयागराजची आहे. प्रत्यक्षदर्शींच्या दाव्यानुसार, हा हल्ला अत्यंत हिंसक झाला, ज्यामध्ये महिलेला मारहाण करण्यात आली, घराबाहेर ओढण्यात आले आणि फाटलेल्या कपड्यांसह सोडून देण्यात आले.
हल्ल्यामागे कौटुंबिक वाद असल्याचे म्हटले जाते
घटनास्थळी उपस्थित असलेल्या रहिवाशांनी सांगितले की, कुटुंबातील सततच्या तणावामुळे हा हिंसाचार घडला असावा. व्हिडिओमध्ये ऐकू येणाऱ्या महिलांच्या दाव्यानुसार, आरोपीला त्याच्या मुलाचं दुसरे लग्न करायचे होते, ज्यामुळे सुनेला घरातून जबरदस्तीने बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले. मीनाक्षी पांडे हिचे लग्न २०२० मध्ये हिमांशू दुबे यांच्याशी झाले होते. ही घटना कुटुंबातील दीर्घकाळ चाललेल्या कौटुंबिक वादातून घडली असल्याचे मानले जाते.
पाहा व्हिडीओ
दुसऱ्या व्हिडिओमुळे गंभीर आरोप
या वादात भर घालत, ऑनलाइन प्रसारित होत असलेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये तीच महिला एका खोलीत दिसत आहे, जिथे तिला तिच्या इच्छेविरुद्ध डांबून ठेवल्याचा दावा तिने केला आहे. त्या रेकॉर्डिंगमध्ये, ती तिच्या हातावरील जखमा दाखवत आहे आणि तिला इजा पोहोचवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप करत आहे. या दाव्यांची सत्यता अद्याप अधिकृतपणे पडताळली गेलेली नाही, परंतु या व्हिडिओंमुळे लोकांची चिंता वाढली आहे. नेटकरीही यावर संताप व्यक्त करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलं, “सासरा आहे की राक्षस?”
पोलिसांच्या प्रतिसादावर प्रश्नचिन्ह
अहवालानुसार, व्हिडिओ समोर आल्यानंतर लगेचच कोणताही औपचारिक गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती महिला असे म्हणताना दिसत आहे की, पोलिसांनी तिची तक्रार ऐकली नाही आणि तिने सोशल मीडियावर तिचा जीव वाचवण्याची विनंती केली आहे.
