Viral video: किंग कोब्रा. सर्पाच्या अनेक खतरनाक जातींपैकी आणखी एक सर्वाधिक विषारी आणि खतरनाक अशी प्रजाती. साधासुधा सापाला घाबरणारे तर किंग कोब्राला पाहून असेच बेशुद्ध पडतील. काहींना तर स्वप्नात जरी साप दिसला, तरी दचकून जाग येते. साप म्हटलं की भल्याभल्यांच्या अंगाला दरदरून घाम फुटतो. पण काही लोक असे आहेत, ज्यांना सापाची बिलकुल भीती वाटत नाही.
काही माणसांसाठी साप म्हणजे एकप्रकारे खेळणंच झालं आहे. पण सापांबरोबरचा खेळ कधी जीवघेणा होईल, याचा अंदाज लावता येणार नाही. सापांसोबत मस्ती करुन त्यांचे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पण हा वेडेपणा काहींच्या अंगलट आल्याच्या धक्कादायक घटनाही घडल्या आहेत. अशाच प्रकारचा सापाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ही हरियाणातील कर्नाल येथे घडून आल्याचे सांगण्यात येत आहे. व्यक्तीला साप पकडण्याची आणि त्यांच्यासोबत खेळण्याची फार आवड होती. गावात कुठेही साप दिसला की, तो लगेच धावत जाऊन त्याला पकडायचा. यावेळीही तशीच परिस्थिती निर्माण झाली, पण यावेळी मात्र कोब्रा जास्तच घातक निघाला. सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात, व्यक्ती कोब्राचे तोंड आपल्या तोंडात टाकताना दिसतो. दृष्य पाहून असे वाटते जणू तो किंग कोब्राचे चुंबनच घेत आहे आणि अशातच पुढे धक्कादायक घटना घडते.
कोब्राला काही व्यक्तीने त्याला पकडलेले आवडले नाही ज्यामुळे त्याने पुढच्याच क्षणी व्यक्तीच्या तोंडावरच त्याला जोरदार दंश केला. व्हिडिओमध्ये या दंशानंतर व्यक्ती नाॅर्मल दिसत असला तरी सांगण्यात येत आहे की काही वेळातच त्याची प्रकृती फार खालावली. कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात दाखल केले पण इथेच त्याचा मृत्यू झाला. ही घटना आपल्याला शिकवते की स्वत:मधील साहस कधीही निरर्थक गोष्टीवर वाया घालवू नये. कधीकधी आपले हेच धैर्य आणि आपल्यावरचा अतिआत्मविश्वास आपल्या जीवास घातक ठरु शकतो
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Deadlykalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे आणि अनेकांनी व्हिडिओला लाइकही केले आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडिया युजर्स व्हिडिओवर विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, ‘प्लिज एवढी रीस्क घेऊ नका’ तर अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं, ‘हा काय वेडेपणा आहे?’. सापाच्या व्हिडीओला हजारो व्यूज मिळाले असून व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
