Shocking video: सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. मनोरंजक व्हिडिओशिवाय अनेक सत्य घटनांचे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. सध्या एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका तरुणाने आपल्या पाठीमागच्या सीटवर बसलेल्या महिलेला अमानुष मारहाण केली आहे. प्रेमात माणूस इतर सगळं विसरून जातो, असं म्हटलं जातं. मात्र अनेकदा हे प्रेमच अतिशय भयानक रूप घेतं. जोडप्यामधील एकाने दुसऱ्यासोबत अतिशय धक्कादायक कृत्य केल्याच्या किंवा हत्या केल्याच्याही घटना समोर येत असतात. आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून अनेकजणांनी त्या तरुणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर वाहनांची वर्दळ, रिक्षा, बाइक सुस्साट धावताहेत अन् एका बाइकवर जोडपं बसलंय. पुढे बसलेला तरूण पाठीमागच्या सीटवर बसलेल्या महिलेला मारहाण करत आहे. हे दृश्य विचलित करणारं आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरच्या रस्त्यावरचा हा व्हिडिओ आहे. बाइकवरून महिला आणि तरूण जात आहे. दोघांमध्येही काहीतरी बिनसल्याचे दृश्यावरून दिसतं. अचानक बाइक चालवणारा तरूण हा पाठीमागे बसलेल्या महिलेचे केस ओढतो. तिच्या तोंडावर निर्दयीपणे ठोसे मारत आहे.

दुसरीकडे मात्र पाठीमागे बसलेली महिला गपगुमान हे सर्व सहन करत आहे. त्यांच्या बाइकच्या पाठीमागे असलेल्या कुणा अनोळखी वाहनचालकानं या घटनेचा व्हिडिओ काढला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ बघून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. जर हे प्रेम चुकीचं वळण घेत असले तर ते वेळीच थांबवलेलं बरं..याचंच एका उदाहरण दाखवणारा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

पाहा व्हिडीओ

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Spotnews_media ने शेअर करून या घटनेची माहिती दिली आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने म्हटले आहे की, अशा लोकांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, “हे कसलं प्रेम बापरे ही कसली मर्दानगी?”? या अशा लोकांमुळेच चांगल्या मुलांचे नाव खराब होते. अनेकांनी त्या मुलालवर काय कारवाई झाली की नाही असा प्रश्न विचारला आहे. एका युजरने म्हटले आहे की, घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?”