Shocking video: सोशल मीडियावर सतत आपल्याला नवनवे व्हिडिओ पाहायला मिळतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. यात अनेक व्हिडिओ मजेशीर असतात. मात्र काही व्हिडिओ असे असतात जे पाहून काळजाचा ठोका चुकतो. हे व्हिडिओ अनेकदा धडकी भरवणारे असतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. बैलाने एका व्यक्तीची काय अवस्था केली आहे, ते तुम्ही व्हिडीओत पाहू शकता. बैल ज्या प्रकारे व्यक्तीवर हल्ला करत आहे ते पाहून कोणाचाही थरकाप उडेल.
धाडस, शौर्य आणि मूर्खपणा यांच्यामध्ये मोठा फरक आहे. पण हे अनेक लोकांना कळत नाही. त्यांचा मूर्खपणा, अतिशहान शहानपणा त्यांना कधी कुठे कसा नडतो हे त्यांच माहिती नसतं. सोशल मीडियावर एका व्यक्तीचा असाच मूर्खपणाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.’ या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बैलाशी मस्ती करताना दिसत आहे. बैलाला चिडवण्याची चूक हा व्यक्ती करतो आणि चांगलाच तोंडावर आपटतो. बैलाची विनाकारण खोड काढणं चांगलंच अंगलट आलंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भर मैदानात मृत्यूचा थरार
तामिळनाडूतील शिवगंगा येथील कराईकुडी येथे रविवारी आयोजित केलेल्या मंजुविरट्टू या बैलाच्या कार्यक्रमादरम्यान एका २८ वर्षीय व्यक्तीचा बैलाने हल्ला केल्याने मृत्यू झाला. कार्यक्रमासाठी दहा बैल आणण्यात आले होते आणि प्रत्येक बैलाला सुमारे ३० मिनिटे मैदानावर सोडण्यात आले होते, नऊ जणांनी ते नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला होता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मदुराई, त्रिची, रामनाथपुरम आणि पुदुकोट्टाईसह अनेक जिल्ह्यांमधून लोक आले होते. कार्यक्रमाच्या चौथ्या फेरीत हा व्यक्ती आपल्या दिशेने धावणाऱ्या बैलाला टाळण्याचा प्रयत्न करत असताना बैल व्यक्तीच्या छातीवर आदळतो आणि बैलाची शिंगे त्याच्या छातीत घुसातात, त्यानंतर तो जमिनीवर कोसळताना दिसत आहे. यानंतर त्याला तात्काळ कराईकुडी सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर हा कार्यक्रम मध्यंतरी थांबवण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे कुंद्रकुडी पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण चर्चा करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर @todaysvoicenews24 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत हजाराहून अधिक लोकांनी पाहिले आहे.
© IE Online Media Services (P) Ltd