Shocking video: अनेकदा तुम्ही लोकांना असं म्हणताना ऐकलं असेल की प्राणी हेच माणसांचे सर्वात जवळचा मित्र असतो. त्यांच्या इतकं ईमानदार कोणीच असू शकत नाही. मात्र, अनेक लोक असे असतात ज्यांना प्राण्यांबद्दल अजिबातही प्रेम वाटत नाही. प्राण्यांना त्रास देण्यात त्यांना मजा येते. नुकताच असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियाचे जग मजेदार फोटो आणि प्राण्यांच्या व्हिडिओंनी भरलेले आहे. ज्या लोकांना प्राण्यांची खूप आवड आहे, ते अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर बघण्यात घालवतात. असे लोक पाळीव प्राण्यांना घरातील सदस्य मानतात आणि त्यांना सांभाळतात. तर असेही काही लोक आहेत जे या मुक्या प्राण्यांना त्रास देण्याचा आनंद घेतात. अशाच एका ठिकाणी तरुणांनी चक्क कुत्र्याच्या पिल्लाला दारू पाजली आहे.

या व्हिडीओमध्ये हे तरुण एका कुत्र्याच्या पिल्लाला जबरदस्तीनं दारू पाजताना दिसत आहेत. या मुलांनी पिल्लाचे हात-पाय जबरदस्तीनं पकडून ठेवले. अन् मग तोंड उघडून बळजबरीनं त्याला दारू पाजली. हा व्हिडीओ पाहून खरंच तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, स्वत:च्या आनंदासाठी दोन तरुण एका कुत्र्याच्या पिल्लाला जबरदस्तीनं दारू पाजत आहेत. ही घटना जयपूरमध्ये घडली आहे. पण हा व्हिडीओ पाहून अगदी प्राणी प्राणी कल्याण संस्थेनं देखील संताप व्यक्त केला आहे. तसंच प्राणी अत्याचार कायद्याअंतर्गत या तरुणांवर कठोर कारवाई करा अशी मागणी पोलिसांकडे केली जात आहे.

यावेळी ते पिल्लू आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतोय मात्र त्यातून त्याला बाहेर पडता येत नाहीये. अतिशय क्रूरपणे हा प्रकार करण्यात आला आहे. हा थरारक व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @palfoundation.in नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं प्रतिक्रिया दिलीय, “घाबरु नको शेवटी इथेच फेडायच ए तुला, देवापेक्षा कर्म मोठे आहेत भाऊ हिशोब होणार” तर आणखी एक म्हणतो, “एक वेळ देव माफ करेल पण कर्म प्रत्येक पापाचं हिशोब ठेवतो”