Son Beats His Parents video: पोटच्या मुलांसाठी आई-वडील वाट्टेल त्या गोष्टी करायला तयार असतात. आपल्या मुलांना साधं खरचटलं तरी आईच्या डोळ्यांत टचकन पाणी येतं. लहानाचं मोठं केलेल्या या मुलांनी आई-वडिलांच्या म्हातारपणी त्यांना व्यवस्थित सांभाळावं, अशी अपेक्षा असते. पण, सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल. राग अनावर झाला की, माणूस काय करील याचा नेम नाही. अशा वेळी तो कोणत्याही थराला जातो; मग समोर कुणीही असो. मात्र, अशा वेळी किमान जन्मदात्या आई-वडिलांचा तरी विचार करायला पाहिजे. सध्या असाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये मुलानं आपल्या आई-वडिलांना रागाच्या भरात रस्त्यावर चपलेनं मारझोड केली आहे.

आईच्या डोळ्यातील अश्रू थांबेनात अन् बापही ओक्साबोक्शी रडतोय

Nagpur police viral video Police Officer Spat On The Man In Maharashtra Shocking Video Goes Viral
“या जागी सर्वसामान्य असता तर?” नागपुरात पोलीसाने दुचाकीवरील दाम्पत्यावर थुंकले; VIDEO पाहून सांगा हे कितपत योग्य
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Viral video of auto-rickshaw driver attacks car and used abusive words while fighting for overtaking in pune
VIDEO: “ऐ, आधी काच खाली घे मग पुढचं बोल”, पुण्यात रिक्षाचालकाची दादागिरी; भररस्त्यात काय केलं पाहा
paddy kamble on arbaz nikki relationship
“त्यांची फालतुगिरी सुरू होती, दोघांनी अफेअर…”, निक्की-अरबाजच्या नात्यावर पंढरीनाथ कांबळेचं रोखठोक मत; म्हणाला…
Lion attacks giraffe
‘देवा, असे आई-वडील कोणालाच देऊ नको…’ सिंहाने जिराफ नर-मादीसमोर पिल्लावर केला क्रूर हल्ला; ते दोघेही फक्त पाहात राहिले… VIDEO पाहून नेटकरी हळहळले
Grandfather propose grandmother as a said I love you funny video
“तू ये साजना…” आजीबाईंनी गुडघ्यावर बसून आजोबांना केलं भन्नाट प्रपोज; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
vegetable buying guide
मार्केटमध्ये भाजी आणायला जाताय? IFS अधिकाऱ्याच्या पत्नीने दिली ‘ही’ यादी; PHOTO चा तुम्हाला फायदा होईल का बघा
Alone giraffe's dilemma from a herd of lions
वाईट अंत! एकट्या जिराफाची सिंहाच्या कळपाकडून कोंडी; पुढे असे काही घडले की… Viral Video पाहून उडेल थरकाप

मन हेलावून टाकणारी ही घटना श्रीनगरमध्ये घडली असून, श्रीनगरमधील एका मुलानं आपल्या आई-वडिलांना वर्षभरापासून घराबाहेर काढलं असून, ते घरात येण्याचा प्रयत्न करताना त्यांना रस्त्यावर मारहाण केली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुलगा आई-वडिलांवर हल्ला करण्यासाठी दुचाकीवरून उतरताना दिसत आहे. त्यानंतर तो त्याची चप्पल काढतो आणि त्याचे आई व वडील हातात सामान घेऊन उभे असताना त्यांना मारहाण करतो. यावेळी तो वडिलांनाही लाथा मारताना दिसत आहे. यावेळी मुलाच्या हल्ल्यापासून आई-वडिल स्वत:चं संरक्षण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पुढे पाहू शकता की, एक तरुण मध्यस्थी करण्यासाठी आला असता, आईच्या डोळ्यांतही अश्रू दिसत आहेत आणि हतबल झालेले वडीलही ओक्साबोक्शी रडत आहेत.

आजारी पालकांवर हल्ला केल्याची घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता त्या निर्दयी मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेटिझन्सनी त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. ताजा बेगम आणि गुलाम अहमद वाणी यांचा मुलगा मोहम्मद अश्रफ वाणी, असं नाव असलेल्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?

मुलानं आई-वडिलांना मारहाण का केली आणि त्यांना घरात प्रवेश का नाकारला, याचा तपास सुरू आहे. या संदर्भात स्थानिक माध्यमांनी असं वृत्त दिलं आहे की, आईच्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध कलमांखाली आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे, ज्यात कलम ७४ (महिलेवर अत्याचार करणे किंवा तिचा राग काढण्याच्या उद्देशाने गुन्हेगारी बळाचा वापर करणे) समाविष्ट आहे. कलम १२६(२) (एखाद्याला कायदेशीररीत्या परवानगी असलेल्या कोणत्याही दिशेने जाण्यापासून प्रतिबंधित करण्याची कृती आणि कलम ३५१(२) (गुन्हेगारी धमकी). २०२४ चा एफआयआर क्रमांक ७७ चा औपचारिक गुन्हा नौगाम पोलिस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आला आहे.