Shocking video: सोशल मीडियावर दिवसभरात भरपूर व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडीओ पहायला मिळातात. मजेशीर, भावनिक, विचित्र, धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. मात्र काही काळापासून असे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये अचानक लोकांचे मृत्यू होत आहेत. हल्ली हृदयविकाराच्या झटक्याद्वारे मृत्यूने झडप घालण्याचे प्रमाण वाढले आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत; ज्यात अनेकांचा अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे जीव गेल्याचे दिसून येते. याचदरम्यान आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येणे, जी सावरण्याची संधीही देत नाही आणि लोकांचे प्राण घेत आहे. यापूर्वी कॉमेडियन राजू श्रीवास्तव, सुप्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेता पुनीत राजकुमार आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचाही व्यायामादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू पावलेल्या अशा लोकांची यादी खूप मोठी आहे. दरम्यान, अशीच एक घटना समोर आली आहे. जीममध्ये व्यायाम करत असताना एका ३७ वर्षीय तरुणाला हृदयविकाराचा झटका आला आहे.
या घटनेचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, जीममध्ये व्यायाम करताना तुम्हीही ही चूक करत नाही ना हे जरूर पाहा. हा मृत्यूचा सगळा थरार जिममध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर माणसाच्या जीवाचा खरंच काही भरोसा नाही, हेच वाक्य प्रत्येकाच्या तोंडातून बाहेर निघेल.
नेमकं काय घडलं?
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला एक तरुण व्यायाम करत आहे. यावेळी त्याला अस्वस्थ वाटत असल्याचं त्याच्या हालचालीवरुन कळत आहे. थोड्यावेळानं तो एका जागेवरुन दुसऱ्या जागी जातो आणि अचानक खाली कोसळतो. तरुणाच्या मृत्यूचा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
पाहा व्हिडीओ
बदललेल्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे तणाव वाढत चालला आहे. त्यामुळे अनेकांना विविध आजारांचा आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. दरम्यान सोशल मीडियावर हा व्हिडीओ @vani_mehrotra नावाच्या एक्स काऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत हळहळ व्यक्त करत आहेत. यातल्या एका कमेंटनं लक्ष वेधून घेतलं ती म्हणजे, “गर्व कशाचा करता हो आजकाल बघा क्षणात सगळं संपतंय” तर आणखी एकानं “आयुष्याचा काही भरवसा राहीला नाही” अशी प्रतिक्रिया दिली आहे.