Viral video: सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ पाहून आपल्याला हसू येतं. तर काही व्हिडिओमुळे काळजाचा ठोका चुकतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो पाहून तुम्हाला धक्का बसेल.काही तरुणांना शायनिंग मारायची फारच हौस असते. विशेषत: मुली समोर दिसल्या की हे तरुण त्यांना इंप्रेस करण्यासाठी नको नको त्या गोष्टी करून दाखवतात. अशाच एका अतिउत्साही तरुणाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडला स्पोर्ट्स बाइकवर बसवून स्टंट करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र पुढच्या क्षणी जे घडलं, ते पाहून प्रत्येकजण थक्क झाला.

काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्रविचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशी सुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. वाहतुकीचे नियम मोडून रस्त्यावर वाहनांची भन्नाट स्टंटबाजी करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत.

व्हिडिओमध्ये दिसतं की एक वर्दळीच्या रस्त्यावर युवक स्पोर्ट्स बाईक अतिवेगात चालवत आहे. यावेळी त्या तरुणाची गर्लफ्रेंड मागच्या सीटवर बसलेली असते आणि तो स्टंट करत करत बाईक चालवण्याचा प्रयत्न करतो. समोरून एक स्कूटर येताना दिसते, ती पाहून युवक अचानक ब्रेक मारतो. पण बाईकचा वेग इतका जास्त असतो की ती अनियंत्रित होते आणि स्कूटरला धडकते. धडक इतकी जबरदस्त असते की बाईकस्वार तरुण आणि त्याची गर्लफ्रेंड दोघेही हवेत उडून सरळ रस्त्यावर आपटतात. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते की मुलगी रस्त्यावर पडल्यावर वेदनेने ओरडत आहे, तर स्कूटरस्वारालाही दुखापत होते.

पाहा व्हिडीओ

हा घडलेला प्रकार नक्की कुठल्या शहरातील आहे ते अद्याप समजलेले नाही. मात्र, सोशल मीडियावर हा व्हिडीओ @da_kerala_girl नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.