Shocking Video of Parents: आई-वडिलांची सेवा करण्यासारखं पुण्य कुठेच नसतं असं म्हणतात. मुलांचं आयुष्य सुखकर व्हाव यासाठी आई वडील जीवाचं रान करत असतात. त्यात गरिबी वाट्याला आली की, अखंड मेहनत घेऊन मुलांना वाढवण्याची जबाबदारी आई वडीलांवर येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लहानपणापासून केलेले हट्ट असो वा मोठेपणी केलेल्या तक्रारी असो आई वडील मुलांच्या सगळ्याच गोष्टी सांभाळून घेतात. पण काहीच मुलांना आई वडीलांने केलेले कष्ट दिसतात, आणि म्हणूनच ते त्यांचा आदर करतात आणि आयुष्यभर त्यांना जपतात. पण ज्यांना आई-वडीलच कळत नाहीत ते उतारवयात आपल्या पालकांची जबाबदारी घ्यायला नकार देतात. आणि जेव्हा त्यांना त्यांच्या मुलांची सर्वात जास्त गरज असते तेव्हाच त्यांना एकटं सोडतात.

हेही वाचा… विद्यार्थ्याचा प्रताप! मिरचीचा स्प्रे, एअर पिस्तूल अन्…, युट्यूब व्हिडीओ बघून घातला बॅंकेत दरोडा; VIDEO पाहून कपाळावर माराल हात

सध्या असाच प्रकार एका वयोवृद्ध आई-वडीलांबरोबर घडलाय जिथे, पाच मुलं असूनही त्यांनी त्यांच्या आईवडीलांचा सांभाळ केला नाही.

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला आजी आजोबांचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. एक मुलाखतदार आजी आजोबांची मुलाखत घेताना या व्हिडीओमध्ये दिसतोय. या मुलाखतीदरम्यान, या वयात आम्ही दोघंच आहोत, आम्हाला कोणच नाही. आम्हाला पाच मुलं आहेत, ते मेले असं आजोबांनी सांगितलं. तर आता आम्ही लेकीजवळ आलो आहोत, ४ वर्ष झाली, असं आजी म्हणाली.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ @sursangam_latur_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “पाच मुलापेक्षा एका मुलीनं आई-वडिलांना दिला आधार” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल याला तब्बल २.७ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… मराठी माणसाचा नाद करायचा नाय! आजोबांनी विद्यार्थ्यांसमोर झाडलं इंग्रजी, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल चकित

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “मी खूप नशिबवान आहे कारण मला एक मुलगी आहे” तर दुसऱ्याने “त्या पाच मुलांना चप्पलने मारा” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “म्हणून मुलीचा आदर करायला शिका” तर एकाने “खरं बोलले मुलगीच आयुष्यात साथ देते” अशी कमेंट केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video of a elder mother father homeless after having 5 son daughter takes care of them viral video on social media dvr