Shocking viral video: उत्तराखंडमधील ऋषिकेश हे भारतातील सर्वात प्रसिद्ध अॅडव्हेंचर स्पोर्ट्सचं ठिकाण आहे. दरवर्षी खूप तरुण तिथे बंजी जंपिंग, राफ्टिंगसारख्या गोष्टी अनुभवायला जातात. पण, याच ठिकाणी एक मोठा अपघात झाला आहे. शिवपुरी येथील थ्रिल फॅक्टरी अॅडव्हेंचर पार्कमध्ये बंजी जंपिंग करताना एक २४ वर्षांचा मुलगा उडी घेतो आणि त्याच क्षणी त्याची दोरी तुटते, त्यामुळे तो थेट खाली कोसळतो आणि त्याचा मृत्यू होतो.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये मुलगा उंच प्लॅटफॉर्मवरून उडी घेताना दिसतो आणि उडी घेतल्याबरोबर त्याची दोरी तुटल्याचं दिसतं. हे दृश्य पाहून लोक खूप घाबरले आहेत आणि साहसी खेळांच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
व्हिडीओमध्ये दिसतं की मुलगा उडी मारताच दोरी ताण घेते, पण अचानक तुटते. दोरी तुटल्यामुळे तो १८० फूट खाली जोरात कोसळतो आणि थेट एका टीनशेडवर आपटतो. आवाज ऐकून जवळचे लोक धावत येतात. नंतर रेस्क्यू टीम त्याला बाहेर काढते. गंभीर जखमी झालेल्या सोनू कुमारला लगेच ॲम्ब्युलन्सने ऋषिकेशला हॉस्पिटलला नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याची प्रकृती खूप गंभीर असल्याचं सांगितलं. या घटनेनंतर पार्कच्या सुरक्षेवर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पाहा व्हिडिओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून लोकांनी मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक लोक ॲडव्हेंचर पार्कवर संताप व्यक्त करत आहेत. काहींनी लिहिलं आहे की, “भारतामध्ये ॲडव्हेंचर स्पोर्ट्सची सुरक्षा अजूनही फक्त कागदावरच आहे.” एका युजरने दुःख व्यक्त करत म्हटलं, “हा तरुण फक्त मजा करायला आला होता… पण, व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे त्याचं आयुष्य धोक्यात आलं.”
एका व्यक्तीने सांगितलं की त्याचे मित्र फक्त सात मिनिटांपूर्वीच तिथे जंप करून गेले होते आणि त्यांच्यानंतर लगेच हा अपघात झाला. काहींनी सरकार आणि प्रशासनावरही टीका करत म्हटलं की अशा पार्कना कठोर नियम, परवाना आणि नियमित सुरक्षा तपासणीशिवाय चालू ठेवू नये. या घटनेची चौकशी सुरू आहे. पोलिसांना अजून अधिकृत तक्रार मिळालेली नाही असं सांगितलं आहे. पण, हा व्हिडीओ पाहून लोकांत भीती, संताप आणि ॲडव्हेंचर स्पोर्ट्सबद्दलचा अविश्वास वाढताना दिसतोय. देशभरात चर्चेत आलेल्या या घटनेकडे आता सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.
