Shocking Video: ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ असं म्हटलं जातं, कारण आईची पोकळी आयुष्यात कोणीच भरून काढू शकत नाही. आई तिच्या मुलांवर खूप प्रेम करते, माया करते; त्यांना ती स्वत:पेक्षा जास्त जपते. स्वत: हालअपेष्टा सहन करून त्यांना लहानाचं मोठं करते. त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, त्यांचे सर्व हट्ट पूर्ण करता यावेत यासाठी दिवस-रात्र झटणारी आई खूप कमी मुलांना कळते. आईने केलेले कष्ट ज्या लेकराला कळतात तोच आईचा आदर करतो.

वय झालं की जी मुलं आईचा आधार बनतात, तिचा सांभाळ करतात त्यांनाच तिचं महत्त्व कळतं. प्रॉपर्टीसाठी भांडणारी, आईचं वय झालं की वृद्धाश्रमात टाकणारी भावंडं आपण सगळीकडेच पाहतो. पण सध्या यापेक्षाही भयंकर घटना घडली आहे, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात, प्रॉपर्टीसाठी दोन्ही भावांनी हद्दच पार केली.

प्रॉपर्टीसाठी भांडणाऱ्या भावांचा व्हिडीओ व्हायरल (Property Fight Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, स्मशानभूमीत मृत आईला आणल्यावर दोन भावांमध्ये जोरदार भांडण सुरू आहे. प्रॉपर्टीसाठी या भावांना कसल्याचंच सोयर-सुतक नसल्याचं व्हिडीओतून दिसून येतंय. यातला एक भाऊ तर थेट आईच्या चितेवरच झोपून भांडण करत असल्याचं दिसून येतंय. दरम्यान, व्हायरल झालेला हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप कळू शकले नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @marathwada_marathi_news या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “वारलेल्या मृत आईच्या दागिन्यांच्या वाटणीवरून दोन भावांत स्मशानभूमीतच वाद; चांदीच्या कड्यासाठी एक भाऊ चितेवरच झोपला! राजस्थान मधील कोटपूतली-बहरोड़ जिल्ह्यातील विराटनगर परिसरातील लाजिरवाणी घटना..!” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ५१ लाखांपेक्षा जास्त व्हयुज आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “अशी मुले जन्माला घालण्यापेक्षा मुलं नसलेलीच बरी” तर दुसऱ्याने “माणुसकी प्रॉपर्टीसाठी संपलेली आहे” अशी कमेंट केली. तर एकाने “इथून पुढे असंच होणार कारण लोकांना पैसा सर्वस्वी झाला आहे, नातं फक्त नावापुरत राहिले” अशी कमेंट केली. “कलयुग आहे. अजून तर आपल्याला खूप पाहायचं आहे. संपत्ती पुढे माणसं नीतिमत्ता विसरले आहेत..” असं एकजण कमेंट करत म्हणाला.