आई आणि तिच्या लेकरांचं नातं अगदी खास असतं. काळजाच्या तुकड्याप्रमाणे आपल्या लेकरांना जपणारी आई प्रत्यही अनेकदा संकटांना सामोरी जात असते. अगदी जन्म दिल्यापासून ते मूल मोठं होईपर्यंत आई आपल्या मुलांना सांभाळते, त्यांचं रक्षण करते. लहान-मोठ्या सगळ्या संकटांत ती आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. आपल्या लेकराला कुठे खरचटलं तरी आईचा जीव वर-खाली होतो. अशा वेळेस जर आपलं लेकरू अचानक गाडीखाली आलं, तर त्या आईचं काय होईल याचा विचार करा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या अपघातांचं प्रमाण खूप वाढत चाललंय, त्यात अनेकदा चालकांच्या एका चुकीमुळे दुसऱ्याचा जीव धोक्यात जाईल हे त्यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांना लक्षातच येत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत एका कारचालकाच्या चुकीमुळे एका आईचं लेकरू गाडीखाली येतं.

कारचालकाची एक चूक पडली महागात

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. या व्हिडीओत एका रस्त्याच्या कडेला एक आई आपल्या लहान मुलासह बसली असते. तेवढ्यात एक कार रिव्हर्स घेत मागे येत असते. रिव्हर्स घेत असताना अचानक कार तिथे असलेल्या खांबाला आदळते आणि रस्त्याच्या कडेला बसलेल्या मुलाच्या अंगावरून जाते. त्या कारचा धक्का त्या आईलाही लागतो.

त्या धक्क्यातून कशीबशी सावरत आई लगेच उठते आणि कारखाली आलेल्या आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करते. नशिबाने तो मुलगा सुखरूप असतो. कारखाली असलेल्या मुलाला आई लगेच उचलते. या धक्कादायक घटनेत त्या मुलाला किती दुखापत झाली हे काही कळले नाही. तसेच ही घटना नेमकी कुठे घडली हेही अद्याप कळू शकले नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @ganeshnishad1585 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “आयुष्यात माहीतच पडत नाही की पुढे जाऊन काय होईल”, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच याला आठ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ पाहून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “त्याला गाडीच्या बाहेर काढून मारलं पाहिजे.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “या कारचालकाला तर शिवीगाळ करायची इच्छा होत आहे माझी.” तर तिसऱ्याने “रिव्हर्स घेताना मागे तरी बघायचं, एक आई आणि लेकरू बसलं आहे”, अशी कमेंट केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video of car took reverse leads to little boy accident mother panicked dvr