Father Beating Child Video: बापाचं आणि त्याच्या लेकरांचं नातं अगदी खास असतं. काळजाच्या तुकड्याप्रमाणे आपल्या लेकराला जपणारा बाप अनेकदा त्याचं संकट स्वत:वर घेतो. लेकाच्या जन्मापासून ते मूल मोठं होईपर्यंत बाप आपल्या मुलाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो, त्यांच रक्षण करतो. कठीण प्रसंगी तो आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. एवढंच नाही तर आपल्या लेकराला कुठे खरचटलं तरी त्याचा जीव वर-खाली होतो. पण स्वत:च्याच लेकराला जपणाऱ्या बापाने जर मर्यादा ओलांडून त्याला मारहाण केली तर…
सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक बाप त्याच्या चिमुकल्या लेकराला मारहाण करतोय. नेमकं काय घडलंय, जाणून घेऊ या…
बापाची लेकराला मारहाण
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा धक्कादायक व्हिडीओ पाहून तुमचाही राग अनावर होईल. या व्हिडीओमध्ये एक बाप आपल्या लहानशा लेकाला अमानुष मारहाण करताना दिसतोय. अगदी कशाचीही पर्वा न करता तो हे विकृत कृत्य करत आहे. आपल्या पोटच्या लेकराचा त्याच्या मनात एकदाही विचार आला नसल्याचं या व्हिडीओतून दिसून येतंय. जोरजोरात जमिनीवर आपटून त्याचे केस ओढून तो त्याला मारताना दिसतोय.
दरम्यान, इतका क्रूरपणा येतो तरी कुठून असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तसंच हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप कळू शकले नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @top_villan_01 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “बाप आहे की हैवान, आई नसल्याची कमी” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसंच हा व्हिडीओ व्हायरल होताच याला ५ हाजारापेक्षा व्हयुज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “असं नका करू” तर दुसऱ्याने “असा कुठे बाप असतो का, आपल्या लेकरालाच मारत सुटलाय” अशी कमेंट केली. तर एकाने “याच्यापेक्षा बाप नसता तर बरं झालं असतं” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “अरे बाप म्हणून चुकलास”