Shocking video: सध्या काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना समोर आली आहे. प्रवासासोबतच अनेकांना साहसी उपक्रम करण्याचीही खूप आवड असते. म्हणूनच बरेच लोक डोंगरात ट्रेकिंग, हायकिंग, बोटिंग, पॅराग्लायडिंग, स्नो रायडिंग आणि बाइक रायडिंगसाठी करतात. आजकाल अनेक लोकांमध्ये पॅरासेलिंगची खूप क्रेझ आहे. जर तुम्ही पहिल्यांदा पॅरासेलिंग करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडीओ पाहा आणि सावध व्हा.

समुद्र किनारे पाहायला आणि फिरायला जायचं हे अनेकाचं स्वप्न असतं. कित्येकदा तुम्ही जायचं प्लॅनिंग करता, आणि ती ट्रीप काहीवेळ रद्दही होते. सोशल मीडियावरही ट्रीपचे मजेशीर मिम्सही व्हायरल होतात. तर, पर्यटनस्थळी अनेकदा साहसी खेळ, जलक्रीडा करण्याचा आनंदही आपण घेत असतो. पॅराग्लायडिंग करताना अनेकदा काहीजण स्टंट देखील करतात, मात्र काहीवेळा हेच पॅराग्लायडिंग जीवावर बेतू शकतं. एका महिला पर्यटकास असाच एक धक्कादायक अनुभव आला असून सुदैवाने तिचा जीव बचावला आहे. सुष्मिता यांनी जागरुकता आणि सावधानतेसाठी ही पोस्ट शेअर केल्याचं म्हटलं आहे.

जगभरातील पर्यटक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मालवणमध्ये पर्यटनासाठी येतात. मात्र, एका पर्यटक महिलेने पॅरासेलिंग करताना अत्यंत भयानक अनुभव सोशल मीडियावर शेअर करत पर्यटकांना सतर्क केलं आहे. सुष्मिता नावाच्या एका महिलेने तिच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरुन या घटनेचा व्हिडिओ शेअर केला असून हा आनंददायी अनुभव तिच्यासाठी मृत्यूचा सापळा कसा ठरला असता याविषयी त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे, पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सुष्मिताने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे, “1 मिनिटाचा थरार… ज्यामुळे माझं सगळंस्व धोक्यात आलं होतं..त्यानंतर त्यांनी आम्हाला मालवणमधल्या चिवला बीचवर नेलं”. पॅरासेलिंगचा एक मजेशीर अनुभव म्हणून जे सुरू झालं… त्याचा शेवट समुद्राच्या मध्यभागी माझी होणारी धडपड असा झाला. पाण्यात पडलो, गळ्याभोवती दोर. घबराट. शांतता. भीती… जेव्हा तुमच्या लक्षात येतं की… आता परिस्थिती तुमच्या नियंत्रणात नाही, तेव्हाची ती भावना कोणताही कॅमेरा टिपू शकत नाही. मी नशीबवान होते. कोणीतरी आलं, कोणीतरी मला वाचवलं. प्रत्येकालाच ती दुसरी संधी मिळत नाही. कोणताही जलक्रीडा प्रकार करून पाहण्यापूर्वी सुरक्षितता तपासा, तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. कारण, काही अनुभव केवळ आठवणी म्हणून राहत नाहीत, ते मानसिक आघात म्हणून कायम राहतात, अशी जागरुक करणारी आणि पर्यटन ठिकाणी अतिउत्साह दाखवणाऱ्या पर्यटकांना सावध करणारी पोस्ट सुष्मिताने लिहिली आहे.

पाहा व्हिडीओ

पर्यटकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न

दरम्यान हा व्हिडीओ गोव्याचा असल्याचा सांगत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,मात्र हा व्हिडीओ गोव्याचा नसल्याचं स्पष्ट झालं आहे. समुद्रकिनारी विविध प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स घेतले जातात. ऐन पर्यटन हंगामात समुद्र किनाऱ्यांवर वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी देश -विदेशातील पर्यटक गर्दी करत असतात. दरम्यान, अशा अपघातांमुळे पर्यटकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत