Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ धक्कादायक असतात. चोरीच्या घटनांविषयी ऐकले तरी अंगावर काटा येतो. चेन स्नॅचिंगचे अनेक प्रकरणे समोर येत आहे. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये चक्क घराच्या गेटवरून चोरांनी एका महिलेच्या गळ्यातील सोन साखळी हिसकावून नेली. पुढे काय घडले, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Woman’s Gold Chain Snatched by Robbers in Broad Daylight at Ghaziabad Home)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

घराच्या गेटवरून गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक महिला तिच्या घराचा गेट उघडताना दिसेल. जेव्हा ती गेट उघडते तेव्हा समोर एक तरुण उभा दिसतो तो तिच्याशी काहीतरी बोलतो आणि त्यानंतर लगेच तिच्या गळ्यातील सोनसाखळी ओढतो. महिला त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते पण तो चोर तिच्या हातून निसटतो आणि घरासमोरच दुचाकी घेऊन उभ्या असलेल्या त्याच्या सहकाऱ्याबरोबर पळतो. महिलेचा किंचाळण्याचा आवाज ऐकून या महिलेच्या घरातून एक महिला आणि एक पुरुष बाहेर येतात. ती महिला या चोराच्या मागे धावते पण तोवर चोर दुचाकीवर बसून पळतो. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

हेही वाचा : ‘शेवटी आनंदी राहण्याचा हक्क सर्वांना…’ एअर वॉकरवर उभं राहून श्वान करतोय मज्जा; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “किती खूश…”

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

Gharkekalesh या एक्स अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भर दिवसा घराच्या गेटवरून चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली. गाझियाबाद उत्तर प्रदेश”

हेही वाचा : ‘बालपण हे असं जगता आलं पाहिजे…’ मराठमोळ्या गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आपण आपल्या घरात सुरक्षित नाही” तर एका युजरने लिहिले, “भावा हल्ली लोक पैसा कमावण्यासाठी शॉर्टकट रस्ते का निवडतात? मेहनत करून पैसा कमावण्यात कोणती अडचण आहे?” आणखी काही युजरने लिहिलेय, “मी विचार करतोय जर ते खरं सोनं नसेल तर” या व्हिडिओवर अनेक युजर्सनी उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली.