गेल्या अनेक वर्षांपासून अपहरणाच्या अनेक घटना देशभरात घडल्या आहेत. या अपहरणामागे नेहमी वेगवेगळी कारणं असली तरी ही क्रूरता अजूनही तशीच आहे. अनेकदा आपण अशा अपहरणांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एका माणसाने एका मुलीचं अपहरण केलंय, पण त्यात पुढे नेमकं काय घडलं ते पाहा…

धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा धक्कादायक व्हिडीओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, दोन मुली रस्त्याने जात असताना एक अपहरणकर्ता त्यातल्या एका मुलीचे अपहरण करतो. जबरदस्तीने तिला खेचून एका व्हॅनमध्ये बसवतो. मुलगी आपल्याला त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करते, पण तो तिला व्हॅनमध्ये बसवतो. तिच्याबरोबर असलेली दुसरी मुलगी हे पाहून खूप घाबरते आणि तिथून पळून जाते. हे सगळं एक माणूस पाहतो आणि त्या मुलीच्या मदतीला अगदी देवासारखा धावून येतो. मुलीला व्हॅनमध्ये जबरदस्तीने बसवलेलं पाहताच तो माणूस तिची मदत करण्यासाठी अपहरणकर्त्याला मारायला जातो.

shocking video
“तोंड टॉयलेट सीटमध्ये कोंबलं वरुन पाणी टाकलं अन्…” वृद्ध महिलेबरोबर घडली थरारक घटना, धक्कादायक VIDEO VIRAL
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Maharashtrachi Hasyajatra fame shivali parab shares bts video of mangala movie
Video: शिवाली परबने ‘मंगला’ चित्रपटातील ‘तो’ सीन केल्यानंतर दिग्दर्शिकेने जोडलेले हात, अभिनेत्री अनुभव सांगत म्हणाली, “एका श्वासात…”
ऑफिसमध्ये तिला एकटीला पाहून त्याने नको त्या ठिकाणी केला स्पर्श, पुढच्याच क्षणी महिलेने काय केलं पाहा, धक्कादायक VIDEO व्हायरल
poonam panday visits mahakumbh mauni amavasya
Video : “माझी सर्व पापं धुतली गेली”, पूनम पांडेने मौनी अमावस्येला गंगेत केले स्नान; महाकुंभातील चेंगराचेंगरीबद्दल म्हणाली…
Shocking video of Thief snatches phone from young girls hand drags her on street Ludhiana video viral on social media
एका चोरीसाठी अक्षरश: तिच्या जीवाशी खेळला! तरुणीच्या हातातून फोन खेचला, तिला रस्त्यावरून फरफटत नेलं अन्…, VIDEO पाहून तुमचाही राग होईल अनावर
Kshitee Jog
क्षिती जोगने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिका का सोडलेली? अभिनेत्री म्हणाली, “खूप चुकतंय…”
Shocking Video Dispute between two neighbours over sweeping broom fight viral on social media
‘ती’ घराबाहेर कचरा काढायला गेली अन्…, दोन शेजाऱ्यांमध्ये पेटला वाद! पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का, VIDEO बघून सांगा चूक कोणाची

हेही वाचा… काका काकूंचा नादच खुळा! भर कार्यक्रमात बॉलीवूड गाण्यावर दोघांनी धरला ठेका, VIDEO एकदा पाहाच

हा धक्कादायक व्हिडीओ @shinewithzme या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “त्या माणसाबद्दल मला आदर आहे”, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. एका दिवसापूर्वी शेअर केलेल्या या व्हिडीओला तब्बल ५.७ मिलियन व्ह्युज आले आहेत. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही व या घटनेत पुढे नेमकं काय घडलं याची माहितीदेखील समोर आलेली नाही.ह

हेही वाचा… “एक मिनिट वाचवण्याच्या नादात सर्व संपून जाईल…” रेल्वे रुळ ओलांडताना बॅरिकेडवर चढला अन् पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का, थरारक VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “तिच्या मैत्रिणीला तिची पर्वा नव्हती”, तर दुसऱ्याने “पुरुष धाडसी असतात” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “म्हणून मुलींवर कधीच विश्वास ठेऊ शकत नाही.” तर एकाने “तुम्ही मुलीला दोष देत आहात, तिने मैत्रिणीला वाचवायचा प्रयत्न केला असता तर तिचेही सहज अपहरण झाले असते, तुम्ही अपहरणकर्त्याला नाही तर त्या मुलीला दोष कसे देेत आहात?” अशी कमेंट केली.

Story img Loader