Shocking Video of Kid Accident: गुजरातमधील नवसारी येथे घडलेल्या एका भीषण अपघातात एक ३ वर्षाचा मुलगा सुखरूप बचावल्याची धक्कादायक पण चमत्कारिक घटना घडली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये असं दिसून येतंय की मुलगा त्याच्या घराबाहेर खेळत असताना एका एसयूव्हीने त्याला चिरडले पण या धक्कादायक अपघातातून तो बचावला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मंगळवारी (२४ जून) दुपारी सुमारे १ वाजता गंदेवी तालुक्यात दिवसाढवळ्या ही घटना घडल्याचे वृत्त आहे. गांदेवी तालुक्यात हा मुलगा घराबाहेर खेळत होता, तेव्हा टोयोटा फॉर्च्युनर SUV गाडी गेटमधून आत येते. गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला दरवाज्याजवळ खेळत असलेला मुलगा दिसत नाही. त्यामुळे चालक गाडी थांबवत नाही आणि थेट मुलावरून गाडी चढवतो. गाडी मुलाच्या डोक्यावर आदळते, तो खाली पडतो आणि संपूर्ण गाडी त्याच्या अंगावरून जाते.
जेव्हा SUV ने मुलाला धडक दिली, तेव्हा त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून आई धावत आली आणि तिने मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. तिने गाडी चालवणाऱ्याला गाडीखाली तिचं मूल आहे असं सांगितलं आणि पुढे जाण्यापासून थांबवलं. व्हिडिओमध्ये ती बाई घाबरलेली दिसली. तसंच ती गाडीखाली पाहत आहे आणि जोरजोरात ओरडत आहे, असंही दिसलं.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video of boy Accident)
थोड्या वेळाने ती बाई गाडीखालून मुलाला बाहेर काढताना दिसते. यात सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे एवढ्या भीषण अपघातातही त्या मुलाला काहीही इजा झाली नाही. जर त्या बाईने वेळेवर चालकाला थांबवलं नसतं, तर ही घटना जीवघेणी ठरू शकली असती.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @Kaushikdd या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला ५ हजारापेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत. घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल तेव्हा लोकांनी याला एक चमत्कार म्हटलं. जर आईने मदत वेळेवर केली नसती, तर हा अपघात दुःखद ठरला असता.