shocking video of man and woman throwing puppy in air goes viral animal lovers express outrage | Loksatta

“रानटी कोण?” कुत्र्याच्या पिल्लाला क्रूरपणे हवेत भिरकवतानाचा Video व्हायरल; प्राणीप्रेमींनी व्यक्त केला संताप

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला किळसवाना व्हिडीओ पाहून तुम्हालाही व्हिडीओतील मुला-मुलीचा राग आल्याशिवाय राहणार नाही

man and woman swinging a dog by its legs
काही लोक विनाकारण मुक्या प्राण्यांना त्रास देतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. (Photo : Twitter)

अनेक लोक पाळीव प्राण्यांवर जीवापाड प्रेम करतात, ते अनेकदा सोशल मीडियावर त्यांच्या पाळीव प्राण्यांसोबतचे फोटो व्हिडिओ शेअर करत असतात. शिवाय अनेक प्राणीप्रेमी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये भटक्या प्राण्यांची सेवा करतानाही दिसतात. मात्र, कधी कधी काही लोक विनाकारण मुक्या प्राण्यांना त्रास देतानाचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हालाही त्या व्हिडीओमधील मुला-मुलीचा राग आल्याशिवाय राहणार नाही.

हो कारण हा व्हिडीओ माणुसकीला काळीमा फासणारा असून त्यामधून माणसांमधील रानटी रूप समोर आलं आहे. या व्हिडीओत एक मुलगी आणि तिच्यासोबत असणारा मुलगा एका निष्पाप कुत्र्याच्या पिल्लाला विनाकारण त्रास देताना दिसत आहेत. ते त्या पिल्लावर करत असलेला अत्याचार पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. शिवाय या घटनेच्या व्हिडीओने सोशल मीडियावर एकच खळबळ उडवून दिली आहे.

हेही पाहा- मुक्या जीवाने राखली भाकरीची जाण, आजारी आजीच्या भेटीला आलेल्या वानराचा हृदयस्पर्शी Video पाहाच

आयएएस अधिकारी अवनीश शरण सतत ट्विटरवर सक्रिय असतात. ते आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे अनेकदा माहितीपूर्ण पोस्ट शेअर करत असतात. यावेळी त्यांनी एक धक्कादायक आणि किळसवाना व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी या व्हिडीओमधील “प्राणी कोण?” असा प्रश्न विचारला आहे.

चेंडू प्रमाणे भिरकावलं कुत्र्याचं पिल्लू –

हेही पाहा- दोन तोंड, तीन पायांचा ‘हा’ कसला विचित्र प्राणी? व्हायरल Video पाहून नेटकरी झाले थक्क

या व्हिडिओमध्ये एक मुलगी आणि मुलगा एका कुत्र्याच्या पिल्लाचे पाय पकडून त्याला हवेत भिरकावताना दिसत आहेत. जे पाहून अनेकांना त्या दोघांचा राग आला आहे. शिवाय नेटकऱ्यांनीदेखील हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी आणि मुलाने एका लहान कुत्र्याच्या पिल्लाच्या पायांना धरल्याचं दिसत आहे. इतकंच नाही तर हे दोघेही व्हिडीओमध्ये कुत्र्याला त्याच्या पायांना अत्यंत क्रूरपणे हिसके देताना दिसत आहेत. एखादा चेंडू हवेत फेकावा तसं त्या कुत्र्याच्या पिल्लाला हवेत भिरकावताना दिसत आहेत.

नेटकरी संतप्त –

हा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी या व्हिडीओतील क्रूर मुलगा आणि मुलीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याच वेळी, अनेकांनी त्या पिल्लाच्या तब्येतीची चौकशी केली आहे. इतर नेटकऱ्यांनी या प्राण्यांसोबत केलेल्या गैरवर्तवणुकीचे वर्णन क्रूर आणि अमानवीय असं केलं आहे. हा व्हायरल होत असलेला नेमका कुठला आहे याबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही, मात्र हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या व्हिडीओत पिल्लावर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी अनेक प्राणीप्रेमींनी केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 19:42 IST
Next Story
मुंबई लोकलमधील ‘या’ व्यक्तीचं का होतंय कौतुक; पाहा Viral Video