Husband Beaten his Wife Video: नवरा बायकोचं नातं जगावेगळं असतं. या नात्यात जितकं प्रेम असतं तितकीच काळजी, तितकंच सुखदेखील असतं. पण आजकाल या नात्यात तितका गोडवा राहिलेला नाही. हल्ली लहान सहान गोष्टींवरून होणारे वाद मारहाणीपर्यंत पोहोचले आहेत. अशा नवरा बायकोच्या वादाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सध्या अशीच एक घटना एका ठिकाणी घडली आहे ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत नवऱ्याने बायकोसह पोटच्या मुलाबरोबरही धक्कादायक कृत्य केलं आहे.

व्हायरल व्हिडीओ (Husband Wife Viral Video:)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, भर रस्त्यात एक माणूस आपल्या बायकोला आणि लहानशा मुलाला रस्त्यावर ढकलतो आहे. रस्त्यावरच गाडी थांबवून त्याने ही विकृती केली आहे.

व्हिडीओत दिसून येतंय की, मुलाला कुशीत घेतलेल्या बायकोला हाताला धरून नवऱ्याने गाडीच्या बाहेर काढलं आणि रस्त्यावर ढकलून दिलं. बायको पुन्हा गाडीत बसण्याचा प्रयत्न करत असताना नवऱ्याने पुन्हा एकदा तिला गाडीतून बाहेर फेकून दिलं.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @status_katta._10 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “जर तुमच्या परिवाराला नीट सांभाळता येत नसेल तर तुम्ही माणूस म्हणून तुमची काहीच लायकी नाही” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसंच हा व्हिडीओ व्हायरल होताच याला पाच हजारापेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप कळू शकले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “जर लक्ष्मीला जपता येत नसेल तर घरी आणायची नाही” तर दुसऱ्याने “अरे त्या लहान मुलीचा तरी विचार कर” अशी कमेंट केली. तर एकाने “त्याच रस्त्यावर त्याला फटके दिले पाहिजेत” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “मग तिला कशाला लग्न करून घरी आणलं”