Viral video : प्राणीसंग्रहालयात जाऊन वन्य प्राण्यांना जवळून पाहण्याचा मोह अनेकांना होतो. मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा अनुभव घ्यायचा असतो, त्यामुळे अनेक कुटुंबं आपल्या मुलांना प्राणीसंग्रहालयात घेऊन जातात. तिथं सुरक्षेची सर्व व्यवस्था केलेली असते, लोकांनी प्राण्यांच्या जवळ न जाण्याचे आणि त्यांना काहीही खाऊ न घालण्याचे नियम असतात. पण, तरीदेखील काही वेळा निष्काळजीपणामुळे किंवा अपघाताने एखादी अनपेक्षित घटना घडते आणि त्याचा परिणाम जीवघेणा ठरू शकतो.
अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक आई आपल्या मुलीला वाचवण्यासाठी सिंहाच्या पिंजऱ्यात उडी मारताना दिसते. हा व्हिडीओ पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा येतो. तथापि, या व्हिडीओची सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही. अनेकांनी म्हटले आहे की हा AI द्वारे जनरेट केलेला आहे. तरीदेखील हा व्हिडीओ पाहून लोकांना एक गोष्ट नक्की समजली की, अशा ठिकाणी थोडा जरी निष्काळजी क्षण आला, तरी मोठा अपघात होऊ शकतो.
हा व्हिडीओ सिंहाच्या पिंजऱ्यात घडलेल्या एका भीषण घटनेवर आधारित आहे. एका छोट्या मुलीचा तोल जाऊन ती थेट पिंजऱ्यात पडते. तिच्या मागेच तिची आई जीवाची पर्वा न करता मुलीला वाचवण्यासाठी पिंजऱ्यात उडी मारते. समोर भला मोठा सिंह असताना आईचं हे पाऊल तिच्या धाडसाचं प्रतीक मानलं जात आहे.
पाहा व्हिडिओ
व्हिडीओच्या सुरुवातीला एक गर्दी दिसते आणि त्यात अचानक एक बाळ पिंजऱ्यात पडते. काही क्षणातच आई त्यामागोमाग उडी घेते. आता सिंह तिच्या दिशेने बघत पुढे सरकताना दिसतो. त्याच वेळी प्राणीसंग्रहालयाचे कर्मचारी धावत येतात आणि सिंहाचे लक्ष विचलित करण्यासाठी मांसाचे तुकडे फेकतात. पुढे व्हिडीओ थांबतो, त्यामुळे त्यानंतर काय घडलं हे स्पष्ट नाही. मात्र, तो प्रसंग पाहून अनेकांनी श्वास रोखला.
या व्हिडीओला ट्विटरवर लाखो व्ह्युज मिळाले आहेत. काहींनी आईच्या धाडसाचं कौतुक केलं आहे, तर काहींनी ही घटना खोटी आणि AI जनरेटेड असल्याचं सांगितलं. अनेकांनी “आई काहीही करेल आपल्या लेकरासाठी” असं लिहिलं, तर काहींनी “अशा ठिकाणी अधिक सुरक्षा हवी” अशी मागणी केली. काहींनी हा व्हिडीओ भावनिक असल्याचं म्हटलं, तर काहींनी तो केवळ मनोरंजनासाठी तयार केलेला असल्याचं नमूद केलं.
या व्हिडीओमधून सर्वांना एक गोष्ट समजली, वन्य प्राण्यांच्या परिसरात थोडासा निष्काळजीपणादेखील आपत्तीला कारणीभूत ठरू शकतो, म्हणूनच प्राणीसंग्रहालयात किंवा तत्सम ठिकाणी नेहमीच नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
