Mother Shocking Video: बाळ जन्माला येण्याआधीपासूनच आईला नऊ महिने खूप काळजी घ्यावी लागते. बाळाच्या जन्मानंतरही शारीरिक, मानसिक त्रास सहन करून आई अगदी काळजाच्या तुकड्यासारखं त्या मुलाला जपते, त्याची काळजी घेते. आईसारखी काळजी या जगात कोणीच घेऊ शकत नाही असं म्हणतात.
पण जर आपल्या मुलाला जीवापेक्षा जास्त जपणाऱ्या आईलाच आपलंच मुल नकोसं झालं तर… ही कल्पनाच मुलांना सहन न होणारी असते. सध्या असाच काहीसा धक्कादायक प्रकार एका ठिकाणी घडलाय; ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
व्हायरल व्हिडीओ (Mother Left Child on Road Video)
महिलेचा हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक महिला आपल्या लहान बाळाला कुशीत घेऊन रस्त्यावरून जात असते. रस्त्याच्या अगदी मधोमध एक गाडी थांबलेली असते. महिला तिच्या हातात असलेल्या बाळाला रस्त्यावर सोडते आणि स्वत: जाऊन गाडीत बसते. गाडीत बसल्यावर गाडीतून एक श्वान बाहेर पडतो आणि रस्त्यावर पडलेल्या त्या लहान बाळाजवळ थांबतो. श्वान आणि लहान बाळाला रस्त्यावर तसंच टाकून ती महिला गाडीतून निघून जाते. दरम्यान, व्हायरल झालेला हा व्हिडीओ खरा नसून एआयमार्फत बनवला आहे असं अनेकांचं म्हणण आहे. परंतु याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @ajit.lavate97 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल १.६ मिलियन व्ह्यूज आले आहेत. तसंच “किती वाईट गोष्ट आहे नकोशी झालेली आपली मुलगी रस्त्यावरच सोडून गेली बाई” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप कळू शकले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “अशांना जीवंत नाही सोडलं पाहिजे”, तर दुसऱ्याने “काय AIची टेक्नॉलॉजी वापरून व्हिडिओ बनवला आहे. ” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, ”आईने अक्षरश: मर्यादाच ओलांडली”